E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
ज्युदोत खुशबूला रौप्य ; जलतरणात धिनिधीला कांस्य
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
युवा ऑलिम्पिकमध्ये भारताला दोन पदके
डकार
: युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खुशबू राजकभाईने ज्युदोमध्ये रौप्यपदक, तर धिनिधी देसिंघूने जलतरणात कांस्यपदक पटकावले. खुश्बूने महिलांच्या 63 किलो वजनी गटात, तर धिनिधीने शंभर मीटर फ्रीस्टाइल प्रकारात ही कामगिरी केली. 15 वर्षीय खुश्बूने ज्युदोच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, सुवर्णपदकाच्या लढतीत जर्मनीच्या जोलिना राइनहोल्डने तिला अवघ्या 48 सेकंदांत इप्पोनच्या जोरावर पराभूत केले. त्यामुळे खुश्बूला रौप्यपदक मिळाले.
अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीत खुश्बूने गिनीच्या मामाइसाटा कामारा आणि मोरोक्कोच्या अबीर बुआज्जाउई यांचा पराभव केला. उपांत्य फेरीत अल्जेरियाच्या दुनिया बेराहुआलला गंभीर शिस्तभंगामुळे अपात्र ठरवण्यात आल्याने खुश्बू अंतिम फेरीत पोहोचली. युवा ऑलिम्पिकमध्ये ज्युदोमध्ये पदक जिंकणारी ती भारताची दुसरी खेळाडू ठरली. यापूर्वी 2018 मध्ये थांगजाम तबाबी देवीने रौप्यपदक जिंकले होते.
दरम्यान, 16 वर्षीय धिनिधी देसिंघूने शंभर मीटर फ्रीस्टाइल शर्यत 56.27 सेकंदांत पूर्ण करत कांस्यपदक मिळवले. क्रोएशियाच्या अना बोबानोविचने 55.89 सेकंदांसह सुवर्ण, तर न्यूझीलंडच्या एलिसा लॉसनने 56.13 सेकंदांसह रौप्यपदक पटकावले. धिनिधीने प्राथमिक फेरीत 56.80 सेकंदांची वेळ नोंदवत आपल्या गटात पहिले स्थान मिळवले होते. अंतिम फेरीतही सातत्यपूर्ण कामगिरी करत तिने भारताला पदक मिळवून दिले. या दोन्ही पदकांमुळे युवा ऑलिम्पिकमधील भारताच्या पदकसंख्येत भर पडली आहे.
Related
Articles
‘द पुणे फाऊंटन पेन शो’तर्फे हस्ताक्षर स्पर्धेचे परितोषिक वितरण
07 Nov 2026
लाडोबा
08 Nov 2026
निर्देशांकात काहीशी वाढ
09 Nov 2026
मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब तुरुंगातच राहणार
07 Nov 2026
स्वच्छ विनोदाचा बादशहा
08 Nov 2026
मुलांना सुरक्षिततेची जाणीव देणे गरजेचे
10 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)