E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून क्रीडा संस्कृती गावागावांत : मुख्यमंत्री
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप
पुणे
: देशातील क्रीडा क्षेत्रात मोठे परिवर्तन होत असून, ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून खेळ ग्रामीण भागातील गावागावांत पोहोचला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजित 41 व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा (मुख्यमंत्री चषक) समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रांत पाटील, आमदार शंकर जगताप, मनपा आयुक्त नवल किशोर राम, क्रिडा आयुक्त दीपक सांगला,बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव सुबिंदर सिंह गिल, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप जोशी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या क्रीडा परिसंस्थेमध्ये बालेवाडी येथील क्रीडा संकुल महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘खेलो इंडिया’ स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करून पदके मिळवत आहेत. राज्य शासनाने ‘मिशन लक्ष्यवेध’च्या माध्यमातून विविध खेळांसाठी उत्कृष्ट प्रशिक्षण देणारी केंद्रे सुरू केली आहेत. बास्केटबॉल हा महाराष्ट्रातील लोकप्रिय खेळ असून, राज्याने देशाला अनेक दर्जेदार खेळाडू दिले आहेत. अशा राष्ट्रीय स्पर्धांमुळे खेळाडूंना अनुभव आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळते. महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेने या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
कुलविंदर सिंग गिल म्हणाले, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या मध्यमातून राज्यातील मुलांच्या आणि मुलींच्या संघांची राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी सातत्याने उंचावत असून, खेळाडू राष्ट्रीय पदकांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले. 41 व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या (मुख्यमंत्री चषक) पारितोषिक वितरण समारंभात वैयक्तिक आणि सांघिक गटातील विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. मुलींच्या गटात तामिळनाडूने, तर मुलांच्या गटात उत्तर प्रदेशने विजेतेपद पटकावले. यावेळी जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये रौप्यपदक मिळविणार्या महाराष्ट्राच्या यशदीप भोगे याचाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
Related
Articles
तामिळनाडूच्या चार मच्छीमारांचे मृतदेह आंध्र प्रदेशात आढळले
06 Nov 2026
वाचक लिहितात
06 Nov 2026
एसआरएचे अधिकार महापालिका आयुक्तांकडे द्या
09 Nov 2026
पेट्रोलमधील इथेनॉलच्या प्रमाणावरून नवा वाद?
08 Nov 2026
मुहूर्ताच्या सत्रात शेअर बाजारात घसरण
09 Nov 2026
उद्योजक राणा सूर्यवंशी यांची ’वाय प्लस’सुरक्षा हटवली
03 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित