E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
सिंधू आणि मीराबाई यांच्यासह 10 खेळाडूंची बिनविरोध निवड
Wrutuja pandharpure
04 Nov 2026
आयओए अॅथलीट आयोग सदस्यपदाची निवडणूक
नवी दिल्ली
: ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि मीराबाई चानू यांच्यासह 10 खेळाडूंची मंगळवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अॅथलीट आयोगाच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. माजी ट्रॅक अँड फील्ड खेळाडू सुधा सिंह यांनी सोमवारी रात्री उशिरा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने मतदानाची गरज उरली नाही. दहा जागांसाठी केवळ दहा उमेदवार शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक अधिकारी संजय के. श्रीवास्तव यांनी मंगळवारी पाच पुरुष आणि पाच महिला अशा सर्व दहा उमेदवारांना बिनविरोध विजयी घोषित केले. यापूर्वी सोमवारी स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत यानेही आपली उमेदवारी मागे घेतली होती. अॅथलीट आयोगाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एक पुरुष आणि एका महिला सदस्याची निवड केली जाणार आहे. या पदांसाठी निवडल्या जाणार्या चार पदाधिकार्यांपैकी दोघांना आयओएच्या कार्यकारी परिषदेचे सदस्यत्व मिळणार आहे. याशिवाय अॅथलीट आयोगाचे दोन सदस्य (एक पुरुष आणि एक महिला) मतदानाच्या अधिकारासह आयओएच्या सर्वसाधारण सभेचे सदस्य बनतील. हे दोन्ही प्रतिनिधी 5 डिसेंबर रोजी होणार्या आयओएच्या कार्यकारी परिषदेच्या निवडणुकीत अॅथलीट आयोगाचे प्रतिनिधित्व करतील.
Related
Articles
लक्ष्मीपूजनानिमित्त फुल बाजार बहरला
07 Nov 2026
पुणेकरांसाठी छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे प्रदर्शन
09 Nov 2026
दांडेकर पुलाजवळ उजव्या मुठा कालव्याला गळती
09 Nov 2026
‘एक देश, एक निवडणुकी’वरून काँग्रेस पुन्हा आक्रमक
05 Nov 2026
कोचीमध्ये सीजेपीचा मोर्चा
08 Nov 2026
भारत-श्रीलंका सामना विशाखापट्टणमला
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)