E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
केवळ घुसखोरांच्या संरक्षणासाठी इंडिया आघाडीचा महामेळावा : सुवेंदू
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
घुसखोरांना ममतांची जावयाप्रमाणे वागणूक
बागडोगरा : घुसखोरांचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने महामेळावा आयोजित केला होता. ममता या घुसखोरांना जावायाप्रमाणे वागणूक देतात, अशी जोरदार टीका पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केली.
सिलिगुडीतील बागडोगरा विमानतळावर अधिकारी बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग देशात बेकायदा राहात असलेल्या घुसखोरांना हाकलून देण्याचे प्रयत्न करत आहे. त्याला इंडिया आघाडी विरोध करत आहे. रामलीला मैदानावरील महामेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल ममता बॅनर्जी यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. पश्चिम बंगालमध्ये दुर्गोत्सवात एका ही मंडळाने ममतांना कार्यक्रमाच्या उद्घाटनाला बोलावले नव्हते. तरीही त्या पोहोचल्या होत्या, असा आरोपही त्यांनी केला. देश विकसित भारत २०४७चे ध्येय बाळगून असताना अनेक निवडणुकीत पराभूत झालेले वैचारिक नक्षलवादी, कट्टरतावादी, डावे पक्ष निदर्शने करत आहेत. आमंत्रण नसताना देखील ममता कार्यक्रमांत सहभागी होत भाषणे ठोकत आहेत, असा आरोप त्यांनी केला. यावेळी अधिकारी यांनी ममतांनी मेळाव्यात सादर केलेल्या येस पापा या बालगीताची व्यंग्यात्मक खिल्ली उडविली. घुसखोरांचे स्वागत त्या यस पापा म्हणून करतात. जणू घुसखोर यांना त्या जावयासारखी वागणूक देतात, असे अधिकारी म्हणाले.
Related
Articles
८७ लाख शेतकर्यांच्या खात्यात ४,३७३ कोटी दिवाळी मदत जमा
07 Nov 2026
लॉस एंजलीसच्या महापौरपदी नित्या रमण
07 Nov 2026
झुंजार अन् जिगरबाज!
08 Nov 2026
आयुक्तांच्या बंगल्याबाहेर मद्यधुंद पोलिसाचा धिंगाणा
05 Nov 2026
पुणे महापालिकेत सहायक आयुक्तांच्या बदल्या
05 Nov 2026
रिंकू सिंहची उपकर्णधारपदी नियुक्ती
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)