E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
जनुकीय फेरफार उत्पादनांना दुग्ध क्षेत्रात परवानगी नाही
Samruddhi Dhayagude
04 Nov 2026
वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडून स्पष्ट
नवी दिल्ली : कोणत्याही देशाशी मुक्त व्यापार करार केला असला तरी जनुकीय फेरफार केलेल्या उत्पादनांना देशातील दुग्ध क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
किरोरी माल महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, देशाच्या दृष्टीने जनुकीय बदल केलेली उत्पादने संवेदनशील विषय आहे. त्यामुळे अशा उत्पादनांच्या आयातीला कदापिही परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे शेतकरी, मच्छिमार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे संरक्षण केले जाईल. काही कृषी, समुद्र आणि दुग्ध उत्पादने आयात करण्याबाबत देश सावध भूमिका घेत आहे. त्या अंतर्गत जनुकीय बदल केलेल्या उत्पादनांना परवानगी दिली जाणार नाही. त्या मागे धार्मिक भावनांचाही समावेश आहे. परदेशातील अनेक देशांत दुग्धजन्य उत्पादनांत वासराचे मांस किंवा रेनेटचा वापर केला जातो. रेनेट एक प्रकारचे एंझाइम आहे. अर्थात त्याला जैव उत्प्रेरक आहे. ते वासराच्या पोटात सापडते. त्याचा वापर परदेशात चीज निर्मितीसाठी केला जातो. अशा उत्पादनांना देशात कदापिही परवानगी दिली जाणार नाही, असे गोयल यांनी स्पष्ट केले.
Related
Articles
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर 1 हजार 746 कोटींच्या कर्जाचा डोंगर
09 Nov 2026
वैभव सुर्यवंशीकडे बिहारचे कर्णधारपद
08 Nov 2026
शनिवारवाडा 38 हजार 233 पणत्यांच्या तेजाने उजळला
09 Nov 2026
दिल्लीत पाच वर्षांतील सर्वांत जास्त प्रदूषित दिवाळी
11 Nov 2026
मुंबईच्या एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात मृत्यू
06 Nov 2026
सोमवती यात्रेनिमित्त खंडोबाचे दुपारी बारा वाजता कर्हा स्नान
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)