पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित   

नवी दिल्ली : पोलिस मुख्यालयाबाहेर पोलिस कर्मचार्‍यांसह निदर्शने केल्या प्रकरणी पोलिस उपायुक्त मनस्वी वशिष्ठ यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.
 
शारदा पोलिस ठाण्यात पोलिस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली होती या प्रकरणीत पोलिस उपायुक्त वशिष्ठ आणि शारदा पोलिस ठाण्याचे अधिकारी अरुण कुमार यांची बदली केली होती. त्याचा निषेध पोलिसांनी आंदोलन करुन केला होता. दरम्यान, वकील ललित बन्सल यांच्यावर हल्ला झाला होता. तेव्हा ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. प्रकरणातील व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी २३ ऑक्टोबर रोजी वकीलही गेले होते. तेव्हा वशिष्ठ आणि अरुण कुमार यांनी पोलिस ठाण्यात ताब्यात असलेल्या आरोपीला अटक केली जाईल, असे आश्वासन दिले. दुसर्‍या दिवशी वकिलांना समजले आरोपीला अटक केली होती.मात्र, नंतर सोडून दिले. त्यामुळे संतापलेले वकील शारदा पोलिस ठाण्यात पोंहोचले. या विषयावरुन पोलिस आणि वकिलांमध्ये वाद झाला आणि त्यातून मारामारी झाली होती. यानंतर पोलिस अधिकार्‍यांची बदली केली होती. त्या पार्श्वभूमीवर सुमारे १५० हून पोलिस कर्मचार्‍यांनी बदली रद्द करण्यासाठी सोमवारी मुख्यालयासमोर आंदोलन केले होते. पोषाखाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे फलक त्यांनी हातात धरले होते. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक १ वर नव नियुक्त पोलिस उपायुक्त सचिन शर्मा पोहोचले होते. त्यांनी आंदोलकांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता  शर्मा यांनी वशिष्ठ यांच्याशी चर्चा केली. तेव्हा पोलिस आयुक्तांशी चर्चा करण्याची तयारी आंदोलक पोलिसांनी दाखवली होती. 
 
दरम्यान, पोलिस कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त अनुराग कुमार यांना पाच मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यामध्ये शारदा पोलिस ठाण्यात दांडगाई करणार्‍या वकिलांवर कारवाई करण्याची आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, ३० हजारी न्यायालयात पोलिस आणि वकील यांच्यात वाद उफाळून आला होता. तेव्हा अशाच प्रकारचे आंदोलन २०१९ मध्ये  मुख्यालयाबाहेर  झाले होते. तेव२ हजार पोलिस कर्मचारी आणि कुटुंबीयांनी आंदोलन केले होते.
 

 

Related Articles