फ्लोरिडात विमान कोसळून नऊ जण ठार; अपघाताचे गूढ कायम   

वेस्ट पाम बीच : अमेरिकेच्या दक्षिण फ्लोरिडाजवळ भीषण विमान दुर्घटना रविवारी रात्री घडली. व्यावसायिक विमान रस्त्यावर कोसळून त्याचे आगीच्या लोळात रुपांतर होऊन नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
 
लोकवस्तीने वेढलेल्या आणि रहदारीच्या मार्गावर विमान कोसळल्याची घटना घडली. लेअरजेट ६० महामार्ग अथवा पाम बीच भागात अन्य कोणी जखमी अथवा मृत झाल्याचे वृत्त नाही. टेक्सासमधील ऑस्टिन बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमानेने उड्डाण केले होते. ते बहमासकडे जात होते. अचानक विमान कोसळण्याचे कारण समजलेले नाही, अशी माहिती विमान प्राधिकरणाने दिली. 
 
ऑस्टिन बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते जिम रेनॉल्ड यांनी सांगितले की, दुर्घटनाग्रस्त विमान खासगी होते. विमानातून कोण प्रवास करत होते ? याचा तपशील मिळालेला नाही. अत्यंत दुदैवी घटना असे वर्णन त्यांनी केले.विमानाच्या शेपटीवरील नंबर एन७७२ बीडी असल्याची माहिती मिळाली. 
 
विमान आकाशात कोसळत असल्याचे आणि त्याचे रुपांतर आगीच्या लोळात होत असल्याची घटना मार्गावर प्रवास करणार्‍या मोटारीतील व्यक्तींनी मोबाइलमध्ये टिपल्या या चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारीत केल्यानंतर घटनेची भयानकता दिसून आली. काही घरांपासून विमान काही अंतरावर कोसळले होते. घटनास्थळी काळा धूर आकाशात पसरत होता, असेही चित्रफितीत दिसले.  मिलेट्री ट्रेल आणि दहा उत्तर अ‍ॅव्हॅन्यू, पाम बीच भागातील शरीफ यांच्या कार्यालयाजवळ दुर्घटना घडली आहे. यानंतर मार्गावरील वाहतूक तातडीने बंद केली. दुर्घटनेनंतर परिसरातील वीजपुरवठा सुमारे दोन तास बंद करण्यात आला होता, अशी माहिती एका महिलेने दिली. विमान कोसळण्याचे नेमके कारण तपासानंतर उघड होईल, असेही सांगण्यात आले. 
 

Related Articles