E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
विदेश
इस्रायलमध्ये आयझनकोट यांचे सरकार?
Samruddhi Dhayagude
03 Nov 2026
बेनेट यांचा पाठिंबा
जेरुसलेम : इस्रायलमधील सत्तास्थापनेच्या संघर्षात विरोधी पक्षनेते गादी आयझनकोट यांची बाजू मजबूत होताना दिसत आहे. माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्या ‘बी’याचाद’ पक्षाने आयझनकोट यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, अरब पक्ष जॉइंट लिस्ट आणि राअम हेही राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांच्याकडे आयझनकोट यांच्या नावाची शिफारस करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेतन्याहू यांना सत्तेतून हटवण्यासाठी विरोधी पक्षांकडून प्रयत्न तीव्र झाले आहेत.
बेनेट यांच्या पक्षाने निवेदन जारी करून आयझनकोट यांना पुढील सरकार स्थापन करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बेनेट यांनी आयझनकोट यांच्याशीही याबाबत चर्चा केली आहे. यापूर्वी जॉइंट लिस्ट आणि राअम हे दोन्ही अरब पक्ष आयझनकोट यांच्या नावाची अध्यक्षांकडे शिफारस करणार आहे. या दोन पक्षांकडे मिळून १९ जागा आहेत. विरोधी आघाडीच्या ४८ जागांसह या शिफारशींची संख्या ६७ पर्यंत पोहोचू शकते. मात्र, ही शिफारशींची संख्या असून प्रत्यक्ष सरकार स्थापनेसाठी सर्व पक्षांची राजकीय सहमती आवश्यक असेल.
नेतन्याहूंच्या आघाडीकडे ५३ जागा
२७ ऑक्टोबरच्या निवडणुकीत इस्रायलच्या १२० सदस्यीय संसदेत कोणत्याही गटाला बहुमत मिळाले नाही. नेतन्याहू यांच्या आघाडीला ५३ जागा, आयझनकोट यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाला ४८ जागा, तर अरब पक्षांना १९ जागा मिळाल्या आहेत. सरकार स्थापनेसाठी ६१ जागांचे बहुमत आवश्यक आहे. नेतन्याहू यांचा लिकुड पक्ष २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आयझनकोट यांच्या याशार पक्षाला २१, तर बेनेट यांच्या बी’याचाद पक्षाला १२ जागा मिळाल्या आहेत.
आयझनकोट यांच्यापुढेही आव्हान
आयझनकोट यांनी संभाव्य सरकारसाठी चार मूलभूत तत्त्वे मांडली आहेत. इस्रायलचे राष्ट्रीय स्वरूप, सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय सेवेशी संबंधित जबाबदार्या आणि गाझा पट्टीतील हमासची लष्करी व प्रशासकीय क्षमता संपवणे या मुद्द्यांचा त्यात समावेश आहे.
या तत्त्वांशी सहमत असलेल्या कोणत्याही खासदाराला सरकारमध्ये सहभागी होता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. मात्र, विरोधी आघाडीतील काही नेत्यांनी अरब पक्षांना सरकारमध्ये सहभागी करून घेण्यास यापूर्वी विरोध केला होता. त्यामुळे जॉइंट लिस्ट आणि राअम यांच्या पाठिंब्याची भूमिका प्रत्यक्ष सरकार स्थापनेच्या वेळी कितपत स्वीकारली जाते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
Related
Articles
अमेरिकेच्या मिलनर शहरात पोलिसांचा सामूहिक राजीनामा
06 Nov 2026
महापालिकेसाठी नवे प्रशासकीय केंद्र उभारणार
07 Nov 2026
तिघांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
07 Nov 2026
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
05 Nov 2026
मुंबईच्या एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात मृत्यू
06 Nov 2026
एसआयआर प्रक्रियेबाबत विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम; भाजपचा आरोप
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)