पाकिस्तानात चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू   

लाहोर : पाकिस्तानातील टीक टॉकर अन्सार महमूद याच्या विवाह  सोहळ्यात चेंगराचेंगरी झाली. एका स्टेडियममध्ये विवाह सोहळा आयोजित केला होता. चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. 
 
पंजाब प्रांताची राजधानी लाहोरपासून १०० किलोमीटवरील सियालकोटच्या फराझ स्पोर्ट स्टेडियममध्ये विवाह सोहळा आयोजित केला होता. अन्सार हा पाकिस्तानात पटलो, या टोपण नावाने परिचित आहे. टीक टॉकवर मेहंदीचे कार्यक्रम सादर करुन त्याने अफाट प्रसिद्धी आणि बक्षीसेही  मिळवली आहेत. चेंगराचेंगरी प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  महमूदसह नऊ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

Related Articles