E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महापौर कार्यालय आणि मेट्रो स्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी
Wrutuja pandharpure
03 Nov 2026
पुणे
: महापालिकेचे महापौर कार्यालय आणि मेट्रो स्थानक बॉम्बस्फोट घडवून उडविण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खलिस्तान नॅशनल आर्मी या संघटनेच्या नावाने हा धमकीचा ई-मेल पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत महापालिकेच्या सुरक्षा विभागाने पोलिसांकडे तक्रार केली. महापालिकेच्या अधिकृत ई-मेलवर हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. ई-मेलमध्ये 27 नोव्हेंबर रोजी महापौर कार्यालय आणि मेट्रो स्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. या ई-मेलसोबत काही छायाचित्रेही जोडण्यात आली आहेत.
महापालिकेच्या सुरक्षा विभागाचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पत्र दिले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सायबर विभागामार्फत तातडीने चौकशी करावी. तसेच धमकीच्या ई-मेलच्या अनुषंगाने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महापौर कार्यालय तसेच संबंधित मेट्रो स्थानक परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची विनंतीही महापालिका सुरक्षा विभागाने पोलिसांकडे केली आहे.
Related
Articles
निवडणुकीत भारतीय वंशाच्या नागरिकांचा डंका
05 Nov 2026
कासव आणि माशांच्या मृत्यूची चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याची आयुक्तांकडे मागणी
06 Nov 2026
रुढी परंपरेनुसार लक्ष्मीपूजन उत्साहात
09 Nov 2026
‘फेडरल रिझर्व’च्या निर्णयावर सोन्याचे भाव अवलंबून
03 Nov 2026
सरफराज खानची निवड प्रक्रियेवर नाराजी
03 Nov 2026
भगवंत मान यांच्या तोंडाला दारूचा वास यायचा : राहुल
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित