E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्वयंसेवकांचा ई-कचरा संकलन मोहिमेत सहभाग
Wrutuja pandharpure
03 Nov 2026
पुणे
: शहरातील इलेक्ट्रॉनिक आणि प्लास्टिक कचर्याच्या संकलनासाठी राबविण्यात आलेल्या ‘पहल 2026’ मोहिमेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम विभागातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.जनवाणी, रिसायकल, ई-रिसायकलबिन, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह, केपीआयटी आणि कमिन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत शहरातील विविध केंद्रांवर कचरा संकलन करण्यात आले.
नागरिकांनी जुने मोबाईल, लॅपटॉप, कीबोर्ड, चार्जर यांसह वापरलेला इलेक्ट्रॉनिक आणि प्लास्टिक कचरा केंद्रांवर जमा केला. स्वयंसेवकांनी सकाळी पावणे नऊ वाजता आपापल्या केंद्रांवर उपस्थित राहून कचरा संकलन, वर्गीकरण आणि जनजागृतीचे काम केले.टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक आणि प्रभारी कुलसचिव डॉ. सुवर्णा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक ओंकार केने आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश रंधवे यांनी मोहिमेचे नियोजन केले. जनवाणी फाउंडेशनचे आतिश भडले यांनी मोहिमेचे समन्वयन करून संकलन केंद्रांना सहकार्य केले. त्याबद्दल विद्यापीठातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. महेश रंधवे यांनी सहभागी स्वयंसेवकांचे कौतुक केले.
Related
Articles
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित
04 Nov 2026
डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
06 Nov 2026
पाकिस्तानचे अध्यक्ष, पंतप्रधान यांच्या दिवाळीनिमित्त शुभेच्छा!
09 Nov 2026
डिसेंबरमध्ये बांगला देशात परतणारच
06 Nov 2026
युरोप दौर्यात बॅडमिंटनपटूंना करावा लागला आर्थिक अडचणींचा सामना
04 Nov 2026
प्रवाशाच्या बेजबाबदार कृत्याने विमानातील प्रवाशांचा जीव धोक्यात
04 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित