E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
प्रत्यक्षात घटना घडताना आपण मौन राहू नये : समीर गायकवाड
Wrutuja pandharpure
03 Nov 2026
पुणे
: ज्या लेखकांना छान छान लिहायचे आहे, त्यांच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. काहीजण स्वमग्न कोशात जगत असतात, तेच त्यांच्या समाजमाध्यमांवर दिसत असते. त्यांचे विश्वच तेवढे असते; परंतु काही लोक वेगवेगळे दावे करत असतात मात्र प्रत्यक्षात घटना घडत असताना ते लोक व्यक्त होत नाही, असे लोक दांभिक असतात. आपण दांभिक नसले पाहिजे. आपण भूमिका घेतली पाहिजे, असे परखड मत लेखक समीर गायकवाड यांनी मांडले.तथाकथित मंडळी या आगळ्या वेगळ्या दिवाळी अंकांच्या प्रकाशन सोहळ्यात गायकवाड बोलत होते. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रतीक्षा खासनीस यांनी अंकातील ’अंगाई’ या कथेचे अभिवाचन सुद्धा केले.
समीर गायकवाड म्हणाले, मी दलित साहित्यिक आहे आणि रोहित वेमुला, साहिल वाकोडे सारखी घटना घडत असेल आणि माझा दावा असेल की माझ्या साहित्यातून दलितांवरील अत्याचाराचा आक्रोश व्यक्त होतो. मी तशा लेखनाचा वारसदार स्वत:ला म्हणवून घेत असेल आणि समाजमाध्यमांमध्ये सक्रीय असूनही मौन असेल तर माझ्या लेखनाला काही अर्थ राहात नाही. जर मी स्त्रीवादी लेखक किंवा लेखिका असेल आणि स्त्रियांवरील अत्याचारांना वाचा फोडत नसेल तर मी अडाणी अशिक्षित आहे. मी एकेकाळी कट्टर विचारांचा होतो, त्यावेळी दंगलींमध्येही सहभागी झालो होतो. माझ्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले होते. त्यानंतर मी विवेकवादी विचारांकडे वळलो.
पारंपरिक पद्धतीने दरवर्षी मराठीत दिवाळी अंक निघत असतात. मात्र चॅट जीपीटी, जेमिनी यांसारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्रास वाढल्यामुळे आणि माणसांनी विचार करणे अधिक आवश्यक असताना आम्ही छायाचित्र हे प्रॉम्प्ट देऊन लेखकांना लिहिण्यासाठी का प्रवृत्त करू नये, हा विचार आल्याचे संपादिका ऋचिता भुजबळ म्हणाल्या. आम्ही दिवाळी अंक काढायलाच हवा, कारण आमचा एक स्पष्ट विचार आहे. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व्हायला हव्या म्हणून आम्ही तथाकथित मंडळी हा गट सुरू केला आणि या गटाची कल्पक आणि विचारपूर्वक केलेली कृती म्हणजे हा दिवाळी अंक आहे, असे आपले मनोगत व्यक्त करताना कार्यकारी संपादक ऋत्विक व्यास म्हणाले. यावेळी केतकी पूरकर, विवेक वंजारी, चैतन्य कुलकर्णी, आदित्य पाध्ये, केदार मराठे, मन्सूर मुल्ला, शार्दूल गाणू, सूरज गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्वी हडप यांनी केले. आभारप्रदर्शन आभा पटवर्धन यांनी मानले.
Related
Articles
शिरपुंजेचा भैरवनाथ गड धार्मिक पर्यटनासह निसर्गप्रेमींचे आकर्षण
04 Nov 2026
अरुण लाल यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार
08 Nov 2026
दिवाळीच्या सुट्टीत बालचमूंचा गड-किल्ले उभारण्याचा उत्साह
07 Nov 2026
मोहिते-पाटलांची टक्कर कायम
09 Nov 2026
ज्येष्ठ चित्रकार अर्पिता सिंग यांचे निधन
09 Nov 2026
गोवत्स पूजनाने दीपावलीला प्रारंभ
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित