E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
मुलांचा गळा आवळून खून करणार्या आईला दुहेरी जन्मठेप
Wrutuja pandharpure
03 Nov 2026
पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सक्तमजुरी
पुणे
: मुलांवरून पतीसोबत झालेल्या वादातून स्वतःच्या दोन चिमुरड्या मुलांचा दोरीने गळा आवळून निर्घृण खून करणार्या आईला जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. भन्साळी यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. जन्मठेपेसह दहा हजार रुपये दंड आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षाही न्यायालयाने ठोठावली.
पूजा संजय सोळंकी (वय-28, रा. मेरिखेडा, ता. हरसोड, जि. खांडवा, मध्य प्रदेश) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. ही घटना 5 जानेवारी 2022 रोजी घडली होती. आरोपी महिलेने तिचा तीन वर्षांचा मुलगा चंदा आणि दोन वर्षांचा मुलगा आनंद या दोघांचा दोरीने गळा आवळून खून केला होता. या घटनेनंतर मुलांचे वडील संजय सोळंकी यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास पौड पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ आणि त्यांच्या पथकाने केला होता. दरम्यान, न्यायालयात साक्ष नोंदविण्यापूर्वी तपास अधिकारी धुमाळ यांचे निधन झाले. त्यामुळे पौड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी संजय शेंडगे यांनी न्यायालयात साक्ष नोंदविली.
खटल्याच्या सुनावणी-दरम्यान सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षीपुरावे आणि अन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी महिलेला दोन्ही मुलांच्या हत्येप्रकरणी दुहेरी जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येकी पाच महिने साधी कैद भोगावी लागणार आहे. तसेच पुरावा नष्ट केल्याच्या गुन्ह्यात तीन वर्षांची सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे वकील विजय फरगडे आणि वकील अनिलकुमार वर्मा यांनी कामकाज पाहिले.
Related
Articles
शमीने वेगवान गोलंदाजीच्या एका युगाला आकार दिला : बीसीसीआय
09 Nov 2026
रविंद्रनाथ टागोर यांच्या शिल्पावर शाई फेकली
08 Nov 2026
मनाचे हे खेळ सारे...
10 Nov 2026
काँग्रेसच्या देणग्या ७५ टक्क्यांनी घटल्या
09 Nov 2026
छावा
07 Nov 2026
स्वामी विवेकानंद यांचा अवमान करणार्या दोन विद्यार्थिनी निलंबित
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)