E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महाराष्ट्र
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूटमार
Samruddhi Dhayagude
03 Nov 2026
सालपे रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत केला बिघाड
सातारा, (वार्ताहर) : पुणे-मिरज रेल्वे मार्गावर सालपे रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड करून सोमवारी मध्यरात्री मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर आठ ते दहा चोरट्यांच्या टोळीने लूटमार केली.
तीन महिला प्रवाशांच्या गळ्यातील ६० ते ६५ हजार किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे पसार झाले. पळून जाताना चोरट्यांनी दगडफेक केली. त्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. या घटनेनंतर पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस परवा मध्यरात्री लोणंद रेल्वे स्थानकावरील थांब्यानंतर सातार्याकडे जात असताना तांबवे व सालपे रेल्वे स्थानकादरम्यानच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड करून चोरट्यांनी रेल्वे थांबवली. त्यानंतर चोरट्यांनी महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खिडकीतून हात घालून हिसकावले. त्यानंतर, अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले. पळून जाताना चोरट्यांनी दगडफेकही केली. या घटनेनंतर महालक्ष्मी एक्स्प्रेससह हुबळी एक्स्प्रेस आणि इतर रेल्वेगाड्या काहीशा विलंबाने धावल्या. मिरज लोहमार्ग पोलिस अधिक तपास करत आहेत.
Related
Articles
पॉवरलिफ्टिंगमध्ये भावना टोकेकर यांची ऐतिहासिक कामगिरी
09 Nov 2026
बनावट चित्रफित प्रकरणी प्रशांत भूषण यांच्यावर गुन्हा
05 Nov 2026
मद्याची वाहतूक करणारे वाहन पकडले; ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
04 Nov 2026
रियाध विमानतळावरील हल्ल्यात आणखी एका भारतीयाचा मृत्यू
06 Nov 2026
‘एक देश, एक निवडणुकी’वरून काँग्रेस पुन्हा आक्रमक
05 Nov 2026
जिल्हा बँकेचा कारभारी कोण? विखे, गडाख, राजळे यांच्या नावांची चर्चा, गुरुवारी निवड
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित