E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महाराष्ट्र
दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती
Samruddhi Dhayagude
03 Nov 2026
मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मृद व जलसंधारणाच्या कामांना गती देणे आणि त्यांचे प्रभावी संनियंत्रण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच, जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समितीही नेमण्यात आली आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘वॉटर कप’ अभियान पुन्हा सुरू करून जलसंधारणासाठी लोकचळवळ उभी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. २०२६ मध्ये कमी पर्जन्यमानामुळे खरीप हंगामात ट्रिगर-१ लागू २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय २५ सप्टेंबर रोजी घेण्यात आला होता. त्या अंतर्गत पाणी फाउंडेशन आणि चंद्रा फाउंडेशनसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून जलसंधारणाची कामे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पाणी फाउंडेशनचे अमीर खान यांनी ‘वॉटर कप’ अभियान पुन्हा सुरू करण्यासह कामांचा नियमित व उच्चस्तरीय आढावा घेण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानुसार सरकारने दोन्ही समित्यांच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. यामुळे जलसंधारणाच्या कामांना प्रशासकीय पाठबळ मिळून लोकसहभागातून पाणी साठवण आणि भूजल पुनर्भरणाला चालना मिळणार आहे.
जीआयएस, उपग्रह प्रतिमांद्वारे नियंत्रण
जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समिती उच्चाधिकार समितीच्या निर्देशांची अंमलबजावणी करेल. वॉटर कप अभियान आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून होणार्या कामांसाठी विविध विभागांना मार्गदर्शन व निर्देश देण्यासह जीआयएस, उपग्रह प्रतिमा, मोबाईल निरीक्षण प्रणाली आणि ऑनलाईन डॅशबोर्डद्वारे कामांच्या प्रगतीवर देखरेख ठेवली जाणार आहे.
मुख्यमंत्री अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सहअध्यक्ष
राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री, तर दोन्ही उपमुख्यमंत्री सहअध्यक्ष असतील. मृद व जलसंधारण, कृषी, ग्रामविकास व पंचायत राज, जलसंपदा, पाणीपुरवठा व स्वच्छता आणि रोजगार हमी विभागांचे मंत्री समितीचे सदस्य असतील. दुष्काळ निवारणाअंतर्गत मृद व जलसंधारणाच्या कामांचे संनियंत्रण आणि प्रगतीचा आढावा घेण्याची जबाबदारी या समितीवर असेल.
Related
Articles
कात्रजच्या पावापुरीत जलमंदिरात आज दीपोत्सव
08 Nov 2026
भारत-पोलंडचा द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट
05 Nov 2026
वर्ल्ड टूर फायनल्समध्ये स्थान मिळवण्याचा लक्ष्य सेनचा प्रयत्न
10 Nov 2026
बांधकामाच्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण रोखा
10 Nov 2026
मनू भाकर, सुरुची अंतिम फेरीत
06 Nov 2026
आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)