E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महाराष्ट्र
‘रेजिम चेंज’ म्हणजे लोकशाही राजकीय व्यवस्था बदलण्याचे कारस्थान
Samruddhi Dhayagude
03 Nov 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांचे टीकास्त्र
मुंबई, (प्रतिनिधी) : देशाच्या माजी पंतप्रधान, दिवंगत इंदिरा गांधी यांनी न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यानंतर राज्यघटना संशोधन करून ते अधिकार गोठवून टाकले होते. इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी यांनी आता रेजिम चेंजची भाषा सुरू केली आहे. रेजिम चेंज म्हणजे लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान असून, ते कदापी यशस्वी होणार नाही, असे टीकास्त्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सोडले.
मुंबईत महायुतीतर्फे शिवाजी पार्क ते कामगार मैदान अशी लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ पदयात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. काँग्रेसचे हे मनसुबे नवे नाहीत असे सांगून फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत प्रत्येक भारतीय नागरिकाला मूलभूत अधिकार दिले. त्यांचे हनन झाले तर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे अधिकार दिले. पण, इंदिरा गांधी यांनी त्यांच्या विरोधात न्यायालयाचा निर्णय गेल्यानंतर संविधान संशोधन करून हेच मूलभूत अधिकार गोठवून टाकले. आता राहुल गांधी यांनी तेच काम सुरू केले आहे.
राज्यघटना तयार केलेली लोकशाही व्यवस्था संपविण्याकरता आंतरराष्ट्रीय कारस्थानाअंतर्गत काँग्रेस रोज मोर्चे काढत आहे. त्यांची घोषणा आहे रेजिम चेंज, सरकार चेंज नाही. सरकार बदलणे म्हणजे काय तर एक सरकार बदलणे व दुसरे आणणे. पण, रेजिम चेंजचा अर्थ म्हणजे राजकीय अर्थव्यवस्था, राज्यघटना बदलायचे.
Related
Articles
लखनौ-आग्रा महामार्गावर भीषण अपघात
09 Nov 2026
तेव्हा सोनिया ‘एनडीए’साठी ’मतचोरी’ करत होत्या का ?
07 Nov 2026
वाङ्मयीन दर्जा राखणारे केसरी-मराठा संस्थेचे तीन दिवाळी अंक
07 Nov 2026
छावा
07 Nov 2026
राष्ट्रवादी अजित पवार गटात दुफळी...!
03 Nov 2026
आशिया चषकासाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा
03 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित