E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
जिल्हा बँकेच्या १० जागांसाठी ९९ टक्के मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Samruddhi Dhayagude
03 Nov 2026
अहिल्यानगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या उर्वरित १० जागांसाठी काल (सोमवारी) जिल्ह्यातील १४ तालुक्यांत चुरशीच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत एकूण ३८३७ मतदारांपैकी ३८०९ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने एकूण टक्केवारी ९९.२७ वर गेली आहे. बँकेच्या एकूण २१ संचालक जागांपैकी ११ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १० जागांसाठी २७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. आज (मंगळवारी) होणार्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर, कोपरगाव, कर्जत, जामखेड, संगमनेर वगळता इतर तालुक्यांत १००% मतदानाची नोंद झाली आहे. या निवडणुकीत भाजपचे नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे पारंपरिक राजकीय विरोधक सहकार पॅनेलच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. त्यांच्या युतीला खासदार निलेश लंके आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या परिवर्तन पॅनेलने आव्हान दिले आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनीही स्वतंत्रपणे आपल्या समर्थकांच्या माध्यमातून निवडणुकीत ताकद लावली आहे.
सुरुवातीला संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, जागावाटपातील तिढ्यामुळे १० जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली. बिनविरोध झालेल्या ११ जागांपैकी १० जागा विखे-थोरात गटाकडे, तर एक जागा राम शिंदे गटाकडे गेली आहे. त्यामुळे उर्वरित जागांच्या निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.मतदानादरम्यान संगमनेर येथे काही ठिकाणी बाचाबाची आणि गोंधळाचे प्रकार घडले. प्रताप ढाकणे यांनी आक्षेप घेतल्याने वातावरण तापले होते. मात्र, प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली.
या निवडणुकीत सभापती प्रा. राम शिंदे, माजी खासदार डॉ. सुजय विखे, खासदार निलेश लंके, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, कोल्हे, तनपुरे यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकार्यांनी मतदानाचा हक्क बजावला.सर्व मतपेट्या कडक पोलिस बंदोबस्तात नगर शहरातील कल्याण रस्त्यावरील अमरज्योत लॉन्स येथील मतमोजणी केंद्रावर जमा करण्यात आल्या आहेत. आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार असून, दुपारपर्यंत बँकेच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
प्रतिष्ठेच्या लढतींकडे लक्ष
पारनेरमध्ये खासदार निलेश लंके विरुद्ध विखे समर्थक राहुल शिंदे, अकोल्यात संजीवनी शिंदे विरुद्ध आमदार किरण लहामटे, तर कर्जतमध्ये राम शिंदे समर्थक ज्योती प्रकाश शिंदे विरुद्ध विखे समर्थक तुषार पिसाळ यांच्यात चुरशीची लढत झाली. महिला राखीव मतदारसंघातील दोन जागांसाठी पाच महिला उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या लढतींच्या निकालाकडे विशेष लक्ष लागले आहे.
Related
Articles
भावा, मला ज्ञानेश दे !
05 Nov 2026
घरगुती फराळ यंदा महाग
05 Nov 2026
कमांडर
09 Nov 2026
दुष्काळाच्या सावटात माणुसकीचा हात
04 Nov 2026
धाराशिवमध्ये ऐन दिवाळीत एका अग्नितांडव !
09 Nov 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे विजयी
04 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित