E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
उद्योजक राणा सूर्यवंशी यांची ’वाय प्लस’सुरक्षा हटवली
Wrutuja pandharpure
03 Nov 2026
राज्य गुप्त वार्ता विभागाचे आदेश
पुणे
: बारामती उद्योजक राणा सूर्यवंशी यांना पुरविण्यात आलेली ’वाय प्लस’ दर्जाची विशेष सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचे आदेश राज्य गुप्त वार्ता विभागाने दिले आहेत. यापुढे सूर्यवंशी यांना केवळ एका बंदूकधारी पोलिस कर्मचार्याचे संरक्षण देण्यात येणार आहे. एसआयडीच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
हडपसर येथील मगरपट्टा सिटी परिसरात वास्तव्यास असलेल्या उद्योजक राणा सूर्यवंशी यांना 17 फेब्रुवारी रोजी राज्य गुप्त वार्ता विभागाकडून वाय प्लस दर्जाची विशेष सुरक्षा पुरविण्याचे आदेश देण्यात आले होते. यापूर्वी सप्टेंबर 2025 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथेही त्यांच्यावर हल्ला झाला होता. तसेच त्यांची शिपिंग कंपनी असून, गडचिरोली जिल्ह्यातही त्यांचे व्यवसाय आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना विशेष सुरक्षा पुरविण्यात आली होती. 18 ऑक्टोबर रोजी बारामती परिसरात सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी सूर्यवंशी यांच्यावर कोयत्याने वार करून हल्ला केला. या घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला.
या प्रकरणात एका अल्पवयीनासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली असता, हल्ल्याच्या वेळी सूर्यवंशी यांच्यासोबत असलेले काही निकटवर्तीयही चित्रीकरणात दिसून आले. त्यानंतर त्यांच्यापैकी तिघे पसार झाल्याचे समोर आले. अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी तपासाचा आढावा घेतला. सूर्यवंशी यांच्या सुरक्षेसाठी शहर पोलिस दलातील कर्मचार्यांव्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांतील पोलिस कर्मचारीही तैनात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या प्रकरणाच्या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्थेचीही तपासणी करण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक निखिल गुप्ता (कायदा व सुव्यवस्था) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सूर्यवंशी यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी त्यांना केवळ एका बंदूकधारी पोलिस कर्मचार्याचे संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.
Related
Articles
मनाचे हे खेळ सारे...
10 Nov 2026
दुष्काळामुळे शेतीकर्जांमधील दोन लाख कोटी रुपये अडकण्याची भीती
10 Nov 2026
इराणवर अमेरिकेचे पुन्हा हल्ले
07 Nov 2026
दूरदृष्टीचे संपादक
06 Nov 2026
युक्रेनवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात 9 जखमी
08 Nov 2026
सीएटलच्या दिवाळी उत्सवात रुढीवादी गटाचा गोंधळ
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)