E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
सरफराज खानची निवड प्रक्रियेवर नाराजी
Wrutuja pandharpure
03 Nov 2026
भारतीय संघ मला फक्त देशांतर्गत कसोटी सामन्यांसाठीच उपयुक्त मानतो
मुंबई
: भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खान याने संघ निवड प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघ व्यवस्थापन सध्या आपल्याला केवळ भारतीय खेळपट्ट्यांवरील कसोटी सामन्यांसाठीच उपयुक्त मानत असल्याचे त्याने म्हटले आहे. निवडकर्ते किंवा संघ व्यवस्थापनाकडून आपल्या भूमिकेबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसल्याचेही त्याने सांगितले.रेल्वेविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात अवघ्या 55 चेंडूंमध्ये शतक झळकावल्यानंतर सरफराजने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी परदेश दौर्यांवर भारतीय संघात संधी न मिळण्याबाबत त्याने प्रश्न उपस्थित केले.
फेब्रुवारी 2024 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्या सरफराजने आतापर्यंत सहा कसोटी सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व सामने भारतातच झाले आहेत. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौर्यासाठीही दुखापतग्रस्त साई सुदर्शनच्या जागी त्याची संघात निवड झाली होती. मात्र, अंतिम अकरा खेळाडूंमध्ये त्याला स्थान मिळाले नाही.परदेशातही आपण धावा केल्या असल्याचे सरफराजने स्पष्ट केले. दक्षिण आफ्रिकेत इंडिया ’अ’ संघाकडून खेळताना त्याने सराव सामन्यात 63 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. तर इंग्लंडमध्येही 76 चेंडूंमध्ये 101 धावांची खेळी केली होती.निवड समितीचा निर्णय हा त्यांचा दृष्टिकोन असल्याचे सांगत, आपले काम क्रिकेट खेळणे आणि धावा करणे एवढेच असल्याची प्रतिक्रिया सरफराजने दिली.
Related
Articles
चारधाम यात्रेची हेलिकॉप्टरसेवा बंद करण्याचा कंपन्यांचा निर्णय
03 Nov 2026
ईडन पार्कची उसळती खेळपट्टी आव्हानात्मक
04 Nov 2026
दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती
03 Nov 2026
महान फुटबॉलपटू रोनाल्डो निवृत्त
06 Nov 2026
युरोप दौर्यात बॅडमिंटनपटूंना करावा लागला आर्थिक अडचणींचा सामना
04 Nov 2026
सीएसके आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चार खेळाडूंची अदलाबदल
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित