E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
ग्लेन फिलिप्सचा विश्वविक्रम
Wrutuja pandharpure
03 Nov 2026
फिल सॉल्टचा विक्रम मोडत ऐतिहासिक कामगिरी
वेलिंग्टन
: न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज ग्लेन फिलिप्स याने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत धावांचा अक्षरशः पाऊस पाडत नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत फिलिप्सने एकूण 341 धावा केल्या. यासह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने इंग्लंडचा स्फोटक फलंदाज फिल सॉल्ट याचा विक्रम मोडीत काढला.
यापूर्वी हा विक्रम फिल सॉल्टच्या नावावर होता. 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत सॉल्टने 331 धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान याने 2022 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 316 धावा करण्याची कामगिरी केली होती. आता 341 धावा करत फिलिप्सने या दोघांनाही मागे टाकले आहे. मालिकेतील निर्णायक सामन्यातही फिलिप्सने आपला आक्रमक अंदाज कायम ठेवला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य होते. या आव्हानाचा पाठलाग करताना फिन अॅलेन लवकर बाद झाला. त्यानंतर टीम सेफर्ट आणि डॅरील मिचेल यांनी डाव सावरला. मिचेलने 29 धावा केल्या. सेफर्टने अवघ्या 50 चेंडूंमध्ये 93 धावांची तुफानी खेळी केली. तर फिलिप्सने 38 चेंडूंमध्ये नाबाद 65 धावा करत न्यूझीलंडला सात गडी राखून विजय मिळवून दिला. या मालिकेतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे फिलिप्सने जागतिक क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप पाडली आहे.
Related
Articles
कास पठार परिसरात जखमी रानगव्याचा वावर
07 Nov 2026
कोचीमध्ये सीजेपीचा मोर्चा
08 Nov 2026
भारतीय जहाजांसाठी होर्मुझचा मार्ग खुला
06 Nov 2026
जैस्वाल, तिलकची दमदार खेळी; भारत ‘अ‘ सुस्थितीत
09 Nov 2026
शेअर बाजाराची कोंडी
08 Nov 2026
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आखाड्यात राजकीय संघर्ष अटळ !
11 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)