शीख धर्मीयांच्या हत्याकांडाचा दिल्लीत मोर्चा काढून निषेध   

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या ३१ ऑक्टोबर   १९८४ रोजी शीख धर्मीय सुरक्षा रक्षकांनी केली होती. या हत्येनंतर १९८४ मध्ये नवी दिल्लीत शीख विरोधी दंगल उसळली होती. तेव्हा दोन हजारांवर शिखांची नृशंस हत्या करण्यात आली होती. त्याचा निषेध भाजपचे नेते आणि हिंसेची झळ पोहोचलेल्या कुटुंबानी सोमवारी मोर्चा काढून केला. 
 
गुरुद्वारा बांगला साहेब ते गुरुद्वारा  रकब जंग साहेब, असा मोर्चा त्यांनी काढला.शीख विरोधात तेव्हा दंगल उसळली होती. त्या हिंसाचाराच्या स्मृतीदिनीच (१ नोव्हेेंबर) रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचा महामेळावा आयोजित करुन काँग्रेसने शीख धर्मीयांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. भाजपने लोकशाही वाचवा, अराजकता हटवा, अशी मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत मोर्चा काढला. लोकशाही वाचवा, अराजकता नको, काँग्रेेसच्या शीख धर्मीय नागरिकांच्या नृशंस हत्याकांडाला देश कधीही विसरणार नाही, असे फलक मोचात झळकले. भाजपच्या खासदार बांसुरी स्वराज आणि कमलजित शेरावत यांच्यासह अन्य नेते आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. शीख विरोधी दंगलीची झळ बसलेल्यांची तमा कधीही काँग्रेसने केली नाही, असा आरोप शेरावत यांनी केला. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या शीख धर्मीयांना आदरांजली वाहण्याऐवजी काँग्रेसने रामलीला मैदानावर महामेळावा आयोजित करुन शीख धर्मीयांच्या जखमेवर मीठ चोळले, असा आरोपही त्यांनी केला भाजपने काढलेला मोर्चा हा तशीख धर्मीयांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि कुटुंबीयांना सहानुभूती दाखवण्यासाठी काढला आहे, असेही त्यांनी सांगितले.
 

Related Articles