E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
गुन्हेगारी जगत
अठरा अधिकारी-कर्मचारी लाचखोरीमुळे गजाआड
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
श्रीमंत असा नावलौकीक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रकार
पिंपरी : राज्यात श्रीमंत असा नावलौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तब्बल अठरा अधिकारी व कर्मचार्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक झाली आहे. ते सर्व गजाआड जाऊन आले आहेत. असे असले तरी, लाचखोरीचे प्रकार काही कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे नगरसेवकांसह, बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक संताप व्यक्त करत आहेत. महापालिकेत प्रत्येक कामासाठी पैश्याची मागणी केली जात असल्याची चर्चा आहे. शिपायापासून अधिकार्यांपर्यंत सर्वांची टक्केवारी ठरलेली असल्याचे बोलले जात आहे. खिसा गरम झाल्यानंतरच फाईल वेगात फिरते; अन्यथा फाईल काही जागची हलत नाही. याला काही प्रामाणिक अधिकारी व कर्मचारी अपवाद आहेत.
सन एप्रिल २०१७ ते २९ ऑक्टोबर २०२६ या नऊ वर्षांच्या कालावधीत तब्बल १८ अधिकारी व कर्मचार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. त्या प्रकरणात ते सर्व जण तुरुंगाची वारी करून आले आहेत. अद्याप काही अधिकारी व कर्मचार्यांची चौकशी सुरू आहे, तर काही जण निर्दोष सुटले असून, ते पुन्हा महापालिकेत रूजू झाले आहेत. अटक होण्याचे प्रकार सतत घडत असतानाही महापालिकेच्या कामासाठी लाच घेण्याचे प्रकार काही कमी होत नसल्याचे दिसत आहे. खुलेआम पैसे मागण्याचे प्रकार कायम आहेत. काही अधिकारी स्वत: लाच घेतात, तर काहींनी त्यासाठी खास माणसाची नियुक्ती केली आहे. टक्केवारी मिळाल्यानंतर फाईल पुढे हलत असल्याचे चित्र आहे. लाचखोरीच्या या वाढत्या प्रकारामुळे सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांसह बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, नागरिक व सामाजिक कार्यकर्ते वैतागले आहेत.
लाचखोरीत स्वीय सहाय्यकापासून मुख्याध्यापक, मुख्य अभियंत्यांचा समावेश
महापालिकेत गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत लाचखोरीचे अनेक प्रकार उघड झाले आहेत. त्यात आयुक्तांचा स्वीय सहाय्यकापासून, बीट निरीक्षक, मुख्याध्यापक, सर्व्हेअर, लिपिक, मुख्य अभियंता यांचा समावेश आहे. मुख्याध्यापिका अलका कांबळे आणि लिपिक बाबासाहेब राठोड यांना कॅण्टीन चालवण्यास देण्याच्या कामासाठी लाच स्वीकारताना ३ एप्रिल २०१७ ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली होती. तत्कालीन आयुक्तांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र शिर्के यांना १२ लाखांची लाच स्वीकारताना २ मे २०१७ ला अटक करण्यात आली होती. महापालिकेचे कर्मचारी तानाजी दाते, किशोर शिंदे, प्रकाश रोहकले, अमोल वाघेरे, उदय वानखेडे, अनिल माने, नगर रचना विभागाचा सर्व्हेअर संदीप लबडे, पाणीपुरवठा विभागाचा अनुरेखक दिलीप आडे, सहाय्यक उद्यान निरीक्षक किरण मांजरे, उपलेखापाल संजय काळभोर, विकास गव्हाणे, कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक तथा बीट निरीक्षक उमेश लोंढ आणि करसंकलन विभागचा लिपिक उमेश कुटे यांना वेगवेगळा प्रकरणात लाच स्वीकारताना अटक झाली आहे. त्यांना महापालिकेने निलंबन केले आहे.
पैशांची मागणी केल्याने भाजप नगरसेवकांची थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव
बांधकाम परवानगी देण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाकडून दुप्पट शुल्काची मागणी करण्यात आली. त्यावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांनी तक्रार केली होती. त्यात प्रकरणात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विजय सोनवणे व उपअभियंता अशोक मोरे यांचे सेवानिलंबन केले. ही कारवाई ११ सप्टेंबर २०२६ ला करण्यात आली होती.
प्रशासकीय राजवटीत लाचखोरीचा कळस?
मुदतीमध्ये निवडणुका न झाल्याने महापालिका १२ मार्च २०२२ ला बरखास्त झाली. दुसर्या दिवसापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली. ती ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू होती. नगरसेवक नसल्याने प्रशासकीय राजवटीत अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मनमर्जी कारभार सुरू होता. त्या काळात लाचखोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात बोकाळला. या चार वर्षांत तब्बल सहा अधिकारी व कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले हेते. अद्याप काही अधिकारी व कर्मचारी प्रशासकीय राजवटीतून बाहेर आलेले नाहीत. हेकेखोर व निर्ढावलेल्या अधिकार्यांमुळे महापालिकेच प्रतिमा ढागळली जात असल्याचे आरोप महापालिका सभेत वारंवार केला जात आहे.
नऊ महिन्यांत तीन जण जाळ्यात
महापालिकेत भाजपची सत्ता दुसर्यांदा आली आहे. भाजपकडून महापालिकेचा कारभार सहा फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. सत्ताधार्यांच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत तीन अधिकारी लाच स्वीकारताना जाळ्यात सापडले आहेत. त्यात मुख्य अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि करसंकलन विभाग लिपिकाचा समावेश आहे.
लाच मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन
महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी महापालिकेशी संबंधित काम करण्यासाठी लाच मागत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपअधिक्षक नीता मिसाळ यांनी केले आहे. तक्रार देण्यासाठी (०२०) २६१३२८०२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९४०३७८१०६४ या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Related
Articles
बुमरा, जडेजा आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर लक्ष
07 Nov 2026
देवगड हापूसच्या एका पेटीला 41 हजारांचा दर
09 Nov 2026
भूसंपादनासाठी महापालिका उचलणार 450 कोटींचे कर्ज
03 Nov 2026
नॅशनल कॉन्फरन्सला धक्का; आगा रुहुल्ला यांचा राजीनामा
04 Nov 2026
दीपोत्सवाचा संदेश (अग्रलेख)
09 Nov 2026
अतिवृष्टी व पूरबाधित शेतकर्यांना २९१ कोटींची मदत
03 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित