E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
दिवाळीच्या फराळाला महागाईचा तडका!
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
लाडू, चकली, करंजी महाग; दरांत २० ते ३० टक्क्यांची वाढ
पिंपरी : दिवाळी तोंडावर येऊन ठेपल्याने बाजारपेठत फराळाच्या पदार्थांची विक्री सुरू झाली आहे. यंदा महागाईमुळे फराळ तयार करण्यासाठी लागणार्या साहित्यांच्या दरात वाढ झाली आहे. तेल, डाळी, साखर, मसाले, सुकामेवा आणि तुपाच्या दरवाढीचा परिणाम तयार फराळाच्या किमतीवर झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दिवाळी सणासाठी घराघरात फराळ तयार करण्याची परंपरा आहे. घरोघरी विविध पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. मात्र नोकरी-व्यवसायामुळे वेळेची कमतरता असणार्या कुटुंबाकडून तयार फराळ खरेदी करण्याला पसंती दिली जाते. त्यामुळे दिवाळीच्या काळात मिठाईची दुकाने आणि फराळ विक्री केंद्रावर ग्राहकांची गर्दी वाढते. दुष्काळी परिस्थितीमुळे कृषी उत्पादने आणि पुरवठा घटल्याने ही तयार फराळांचे दर वाढत आहेत. त्यामुळे यंदा ग्राहकांच्या खिशाला जादा भुर्दंड पडणार आहे.
यंदाची दिवाळी खर्चिक असणार
दरवाढीमुळे दिवाळीचा गोडवा वाढवणार्या तयार लाडू, करंजी, शंकरपाळी, अनारसी, चकली यासारख्या पदार्थांसाठी यंदा ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कमी पावसामुळे विविध पिकांच्या उत्पादनातील घट आणि तुलनेत कायम असलेल्या मागणीमुळे दिवाळी फराळासाठी लागणार्या बहुतांश वस्तूंच्या दरात गतवर्षाच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढलेल्या दरामुळे ग्राहकांचे बजेट कोलमडणार असून, यंदाची दिवाळी अधिक खर्चिक असणार आहे.
दररोजचा किराणाही घेणे झाले अवघड
फक्त दिवाळीच्या फराळाचे साहित्यच नव्हे तर दररोज लागणारे धान्यांच्या दरातही वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने ज्वारी, हरभरा डाळ, तांदूळ आणि शेंगदाण्याचे दर वाढले आहेत. चांगल्या प्रतिच्या ज्वारीचे दर ८० रुपयांच्या जवळपास पोचल्याने भाकरी आता श्रीमंताचे खाद्य बनले आहे. तसेच, हरभरा डाळ आणि तांदळाच्या किमतीतदेखील झपाट्याने वाढ झाली आहे.
दुष्काळाचा परिणाम
फराळ तयार करण्यापासून ते दिवाळीच्या खरेदीपर्यंत सर्वच खर्च वाढला आहे. यंदा राज्यातील अनेक भागात अत्यल्प पाऊस पडला आहे. त्याचा थेट परिणाम खरीप पिकांवर झाला. काही भागात शेतकर्यांच्या हातची पीक गेली तर अनेक ठिकाणी उत्पादनात घट झाली. त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या धान्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यातच ऐन सणासुदीच्या काळात अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.
खोबर्याचे दर ४०० रुपये किलोच्या पुढे
दिवाळीच्या फराळासाठी प्रामुख्याने वापरले जाणारे पोहे, तांदूळ, साखर, तेल, खोबरे, भाजकी डाळ, हरभरा डाळ, बेसन आणि सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्याने फराळाचा खर्च वाढणार आहे. चकली, चिवडा, लाडू आणि करंजी यासारखे पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी साहित्यांच्या किमती वाढल्यामुळे घरगुती फराळाचे गणितही बदलणार आहे. विशेषतः खोबर्याचे दर प्रति किलो ४०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. तेलाच्या किमतीतही वाढ झाल्याने तळणीच्या पदार्थाचा खर्च वाढणार आहे.
काटकसरीत साजरी करावी लागणार दिवाळी...
एकीकडे दिवाळीचा उत्साह आणि दुसरीकडे वाढती महागाई अशा दुहेरी परिस्थितीत यंदाचा सण साजरा करावा लागणार आहे. फराळाचा गोडवा कायम ठेवताना खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान सर्वसामान्य कुटुंबांसमोर उभे राहिले आहे. यंदाच्या दिवाळीत आनंदासोबत काटकसरीचे गणितही महत्त्वाचे ठरणार आहे. दिवाळीत घरी फराळ तयार करण्याची परंपरा आजही अनेक कुटुंबांमध्ये जपली जाते, मात्र यंदा खर्च साहित्य एकाचवेळी खरेदी करताना ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
दिवाळीपूर्वी ड्रायफ्रूट महागले; बदाम-पिस्त्याच्या दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ
पिंपरी : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ड्रायफ्रूटच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काजू, पिस्ता, बदाम आणि खजुराच्या दरांत वाढ झाली असून, दिवाळीच्या फराळासाठी तसेच भेटवस्तू देण्यासाठी ड्रायफ्रूट खरेदी करणार्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. बदामाच्या दरात सुमारे २० टक्के, पिस्त्याच्या दरात २० ते २५ टक्के तर काजूच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबीयांचे दिवाळीचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.
दिवाळीच्या काळात फराळाचे पदार्थ घरी केले जातात किंवा तयार पदार्थ आणले जातात. सध्या ड्रायफ्रूटच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे. वाढलेल्या किमतीमुळे नागरिक आवश्यक तेवढेच वस्तूंची खरेदी करताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने महागाईवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वाहतूक खर्च, मजुरी, उत्पादनातील घट कारणीभूत
ड्रायफ्रुटच्या दरवाढीमागे वाढलेला वाहतूक खर्च, मजुरीतील वाढ आणि उत्पादनांमध्ये झालेली घट ही प्रमुख कारणे आहेत. बदामाची आवक प्रामुख्याने अमेरिकेतून, पिस्त्याची इराणमधून तर खजुराची सौदी अरेबियातून होते. याच्या वाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे शहरातील बदाम, पिस्ता आणि खजुराच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांमध्ये दिवसेंदिवस जागरुकता वाढत आहे. त्यामुळे ड्रायफ्रूडची मागणीही वाढतच आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दीड पटीने भाव वाढले असल्याचे एका दुकानदाराने सांगितले.
Related
Articles
महापालिकेच्या आठ शाळा होणार सीबीएसई
06 Nov 2026
पद्मावती मेट्रो स्थानकासाठी महापालिका देणार 665 चौरस मीटर जागा
06 Nov 2026
दूरगाव तलावातील पाण्याचा अनधिकृत उपसा थांबविण्याची मागणी
09 Nov 2026
पुण्यातील सहा ‘आपला दवाखाने’ रद्द
08 Nov 2026
व्हॉट्सऍप कट्टा
05 Nov 2026
शेतकर्यांनी हक्कासाठी रस्त्यावर उतरावे : राजू शेट्टी
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)