E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
पिंपरी-चिंचवडमध्ये ६ महिन्यांत ६७२ गृहप्रकल्पांना मंजुरी
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
महापालिकेला ३८३ कोटींचा महसूल
पिंपरी : गेल्या काही वर्षांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात नवनवीन गृहप्रकल्प उभारले जात आहेत. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत तब्बल ६७२ गृहप्रकल्पांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामधून महापालिकेला ३८३ कोटी ४८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ९५ कोटी रुपयांचे अधिकचे उत्पन्न जमा झाले आहे. दुष्काळस्थितीमुळे यापुढे नवीन गृहप्रकल्पांना परवनागी न दिल्यास बांधकाम विभागाचे उत्पन्न यंदा घटण्याची शक्यता आहे. शहर चारही बाजूने विस्तारत असून, मोठ-मोठे टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली आहे. परंतू, वाढत्या लोकसंख्येमुळे महापालिकेला मुलभूत सुविधा पुरविताना मोठी दमछाक होत आहे.
बांधकाम विभागाला सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात ८९० कोटींचे उदिष्ट आहे. पहिल्या सहामाहीत म्हणजे एक एप्रिल ते ३० सप्टेंबर या नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी या दोन मोठ्या सणात गृहप्रकल्पांचा प्रारंभ होत असतो. मात्र, गेल्या वर्षी पहिल्या सहामाहीत ४६६ गृहप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. यातून २८८ कोटी ९८ लाख ५७ हजार रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले होते. त्या तुलनेत यंदा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या सहामाहीत ६७२ गृहप्रकल्पांना परवानगी दिली आहे. या प्रकल्पांच्या मंजुरीतून ३८३ कोटी ४८ लाख ८५ हजार रुपयांचे उत्पन्न महापालिका तिजोरीत जमा झाले आहे.
पुढील सहा महिन्यांत अर्थसंकल्पात दिलेल्या उद्दिष्टापर्यंत उत्पन्न बांधकाम विभागास मिळेल, अशी अपेक्षा अधिकार्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, दुष्काळाच्या परिस्थितीमुळे नवीन गृहप्रकल्पांना मंजुरी देऊ नये, अशी मागणी शासन तसेच, महापालिकेकडे होऊ लागली आहे. शहरात पाण्याचे संकट वाढू नये, असा विचार करून नवीन बांधकामांना बंदी घातल्यास महापालिकेला बांधकाम परवानगीतून मिळणार्या उत्पन्नावर पाणी फिरवावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Related
Articles
शहा यांनी दिलेले चर्चेचे आव्हान राहुल यांनी स्वीकारावे
04 Nov 2026
छळाला कंटाळून व्यावसायिकाच्या सुनेची आत्महत्या
03 Nov 2026
गोदावरी खोर्यात पाणी उपलब्धतेसाठी नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य : विखे
04 Nov 2026
संवत्सर संपेपर्यंत लक्ष्मीची ’पूजा अर्चा’ करा
09 Nov 2026
ज्येष्ठ प्रकाशक, मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांचे निधन!
07 Nov 2026
कोलंबियातील लष्करी तळावर ड्रोन हल्ला
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित