E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
मनोरंजन
संगीत रंगभूमीवरील गंधर्वबाला : निर्मलाताई गोगटे
Samruddhi Dhayagude
03 Nov 2026
पुणे : संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री निर्मलाताई गोगटे यांनी सोमवारी ९१ व्या वर्षात पदार्पण केले. बऱ्याच दर्जेदार संगीत नाटकांत अभिनयासह त्यांनी गायन केले. नव्वदीच्या असून मनाने त्या आजही तरुणच; त्यांची संगीतसाधना अविरत सुरू आहे.
सात्विक सौंदर्यासह निर्मलातईंना, सुरेल आवाजाचीही देणगी! लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. महिला कला संगमच्या ‘संगीत सौभद्र’मधून सुभद्रेची भूमिका साकारत रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. तिथे काम करणार्या सर्व महिलाच असल्याने त्यांना घरून परवानगी मिळाली. कामाचे कौतुक झाले ; त्याच उत्साहात पुढे व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी प्रवेश केला. दिग्गजांच्या सहवासात त्यांच्या कलेची साधना बहरत गेली. ‘सत्याग्रही’ आणि ‘विद्याहरण’ यांसारख्या नाटकांत त्यांनी काम केले.
‘संगीत सौभद्र’, ‘संगीत स्वयंवर’, ‘एकच प्याला’, ‘संशयकल्लोळ’ आणि ‘ मानापमान’ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका रसिकांच्या स्मरणात राहिल्या. ‘संगीत स्वयंवर’ विशेष गाजले. मराठी रंगभूमीबरोबरच संस्कृत नाटकांमध्येही त्यांनी काम केले.
निर्मला गोगटे यांचा जन्म मुंबईचा असून पं. कृष्णराव चोणकर, प्रा.बी.आर. देवधर यांचेकडून स्वर साधना शास्त्राचे विशेष मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे. सुरुवातीच्या काळात महिला कलासंगम या स्त्रियांच्या संगीत नाटकांतून नायिकेच्या भूमिका त्यांनी केल्या. साहित्य संघ मंदिर, मुंबई या संस्थेमार्फत व्यावसायिक रंगभूमीवर मा. दामले, सुरेश हळदणकर, प्रसाद सावकार, नानासाहेब फाटक, राम मराठे, रामदास कामत, छोटा गंधर्व, दाजी भाटवडेकर यांसारख्या नामवंत कलाकारांसमवेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. व्यावसायिक रंगभूमीबरोबरच त्यांनी अनेक संस्कृत नाटकांतही भूमिका केल्या. त्यांनी गायनाच्या अनेक मैफिली रंगवल्या, भारतात तसेच परदेशात आकाशवाणी व दूरदर्शनवर गायनाचे कार्यक्रम त्यांनी केले आहेत.
त्यांनी गायिलेली ‘एकला नयनाला’, ‘ओठांवरती रोज ’, ‘जय जय विठ्ठल रखुमाई’, ‘पाही सदा मी’,‘मम आत्मा गमला’, ‘मी बोलू कुणा प्रभु’, रूपबली तो नरशार्दुल’, ‘श्रीहरी गोड तुझी बासरी’ , ‘सवतचि भासे मला’, ‘सृजन कसा मन चोरी’, ‘हा टकमक पाही’ अशी अनेक गीते आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांना ‘गंधर्वबाला’ असे संबोधले. ही उपाधी त्यांच्या कलागुणांची पावतीच म्हणावी लागेल.महाराष्ट्र शासनाचा ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ ‘बालगंधर्व पुरस्कार’ अशा अनेक सन्मानांनी त्यांचा गौरव झाला आहे. त्यांचे सर्वांत आवडते नाटक कोणते याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, नाटकांसाठी मी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे माझी सर्वच नाटकं आवडतीच; परंतु संगीत स्वयंवरसाठी मी विशेष मेहनत घेतली, ते नाटक मला जास्त प्रिय आहे.
त्या सांगतात, ‘मी जेव्हा काम करायला सुरुवात करत होते, कल्पना करा की, त्या काळचा समाज कसा होता, मुलींनी नाटकात काम करायचे नाही, असा तो काळ होता. पुढे काम करायला मिळाले, परंतु संगीत मंदारमाला, ययाती आणि देवयानी, भूमिकन्या सीता यासारखी अनेक नाटके हातून निसटून गेली.‘ ही सल आहेच; तरीही जे क्षण हाती आले त्याचे सोनं करण्यात त्या रमल्या. मराठी संगीत नाटकांसह संस्कृत नाटकांमध्ये दीर्घकाळ काम करणार्या निर्मलाताई आजही त्या स्वत: संस्कृतचे धडे गिरवताहेत. या क्षेत्रातील पुढच्या पिढीला प्रोत्साहन देत त्यांना संगीत शिकवताहेत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!
‘आज मागे वळून पाहताना मला खूप छान वाटतं. जे काम मिळालं त्याला मी न्याय देऊ शकले याचं समाधान वाटतं; परंतु काही नाटकांमध्ये काम करता आलं नाही ही सल आहेच. मी रसिकांची ऋणी आहे; मुख्य म्हणजे पुणेकर रसिक. त्यांनी मला भरभरून प्रेम दिले. ज्यांनी मला शिकवले ते गुरूजन, सहकलाकार या सर्वांमुळे मी इथवर प्रवास करू शकले. आपलं काम चांगलं करण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेतच असतो; परंतु रसिकांच्या प्रेमाशिवाय कलावंत मोठा होत नाही, हेही तेवढंच खरं आहे.‘
- निर्मलाताई गोगटे, ज्येष्ठ संगीत गायिका
- संकलन : जयश्री कुलकर्णी
Related
Articles
कास पठार परिसरात जखमी रानगव्याचा वावर
07 Nov 2026
आयुषच्या तिन्ही अभ्यासक्रमांना 84.30 टक्के प्रवेश
09 Nov 2026
प्रसिद्ध कृष्णा कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्त
05 Nov 2026
निवडणुकीपूर्वी इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत होते नेतन्याहू
09 Nov 2026
वगळलेल्या मतदारांना आयोगाकडून नवी संधी
07 Nov 2026
महापालिकेच्या आठ शाळा होणार सीबीएसई
06 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)