व्यावसायिक सिलिंडर दहा रुपयांनी महाग   

नवी दिल्ली : धनत्रयोदशी आणि दिवाळी तोंडावर असताना देशातील तेल आणि वायू उत्पादक कंपन्यांनी रविवारी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात दहा रुपयांनी वाढ केली. तसेच विमानाच्या इंधनात प्रति लिटरमागे १.३७ रुपयांनी वाढ केली. त्यामुळे इंधनाचा लीटरचा १३८.५० रुपये झाला. घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ केली नाही. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
 
व्यावसायिक सिलिंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल आणि रेस्टारंट व्यवसायिक करतात,. १९ किलोचा सिलिंडरमध्ये दहा रुपयांनी वाढ केल्यामुळे सिलिंडरचा दर २ हजार ८२० रुपये झाला. यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी ६२.५० रुपयांची वाढ केली होती. त्यानंतरची केलेली ही दुसरी दरवाढ आहे. त्यापूर्वी सप्टेंबरमध्ये ९.५० रुपयांनी दरवाढ केली होती. 
 
दोन महिन्यांतील या वाढीपूर्वी, ऑगस्टमध्ये १९२ रुपये आणि जुलैमध्ये १८३.५० रुपयांची सलग दोन महिन्यांत कपात करण्यात आली होती. जागतिक ऊर्जा पुरवठ्यातील व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या किमतींमुळे जून महिन्यात व्यावसायिक एलपीजीच्या किमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या होत्या, त्यानंतर ही कपात करण्यात आली होती. फेब्रुवारी आणि जून दरम्यान सिलिंडरचे दर १ हजार ३७३ ने वाढले. त्यामुळे एका सिलिंडरचा दर १ हजार ७४०.५० वरुन वाढून ३ हजार ११३.५० पर्यंत गेला होता. मात्र, जुर्ल आणि ऑगस्टमध्ये दर कमी केले होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तणवामुळे विमानाच्या इंधनात सलग चौथ्या महिन्यात वाढ केली. ऑक्टोबरमध्ये लीटरमागे १६ रुपयांनी वाढ केली. सप्टेंबरमध्ये ६.२८ रुपयांनी तर ऑगस्टमध्ये पाच रुपयांनी वाढ केली. त्यामुळे इंधनात ४० टक्के वाढ झाली आहे.  त्यामुळे विमान वाहतुकीचा खर्च वाढला आहे. 
 
घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे
 
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ केली नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. १४.२ किलोचा सिलिंडरचा दर ९४२ रुपयेच आहे. पश्चिम आशिायातील युद्धामुळे इंधन, वायूच्या पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली होती.  तसेच दरही वाढले होते. त्यामुळे कंपनीं मार्च आणि जूनमध्ये सिलिंडरच्या दरात  ८९ रुपयांनी वाढ केली होती.
 

Related Articles