E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
विदेश
’वॉल स्ट्रीट जर्नल’ विरोधातील ट्रम्प यांचा मानहानीचा दावा फेटाळला
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
वॉशिंग्टन : जेफ्री एपस्टीन याच्याशी असलेल्या संबंधांबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ आणि त्याचे मालक रूपर्ट मर्डोक यांच्याविरोधात दाखल केलेला १० अब्ज डॉलरचा मानहानीचा खटला अमेरिकन संघीय न्यायालयाने कायमस्वरूपी फेटाळला. मियामी येथील जिल्हा न्यायाधीश डॅरिन गेल्स यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे ट्रम्प यांना या प्रकरणात पुन्हा नव्याने खटला दाखल करता येणार नाही.
न्यायालयाने म्हटले की, ट्रम्प यांना संबंधित वृत्त मानहानीकारक असल्याचे आणि ते प्रसिद्ध करताना वृत्तपत्राने कायद्यानुसार आवश्यक असलेला दुर्भावनापूर्ण हेतू ठेवला होता, हे सिद्ध करता आले नाही. वृत्तपत्राच्या शोधपत्रकारितेतील त्रुटी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न अर्जाद्वारे करण्यात आल्याचेही न्यायाधीशांनी नमूद केले.
यापूर्वी एप्रिल २०२६ मध्येही न्यायाधीश गेल्स यांनी ट्रम्प यांचा हा खटला फेटाळला होता. मात्र, त्यावेळी नव्याने सुधारित अर्ज दाखल करण्याची संधी देण्यात आली होती. ट्रम्प यांच्या वकिलांनी मे महिन्यात सुधारित अर्ज दाखल केला. त्यानंतर शनिवारी न्यायालयाने दुसर्यांदा खटला फेटाळताना तो कायमस्वरूपी निकाली काढला.
या प्रकरणात ट्रम्प यांच्या कायदेशीर पथकाने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी संबंधित वृत्त फेटाळून लावत ते खोटे आणि बदनामीकारक असल्याचा आरोप केला होता.
काय होते प्रकरण?
‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने २०२५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, २००३ मध्ये जेफ्री एपस्टीनच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त तयार करण्यात आलेल्या अल्बममध्ये ट्रम्प यांच्या नावाने एक पत्र आणि चित्र समाविष्ट होते. या पत्रात अश्लिल मजकूर आणि महिलेचे नग्न रेखाचित्र असल्याचे वृत्तात म्हटले होते. मात्र, ट्रम्प यांनी हे पत्र आपण लिहिले नसल्याचे सांगत वृत्तातील दावे नाकारले होते.
Related
Articles
लक्ष्मीपूजनासाठी व्यापारी सज्ज; दुकानांमध्ये विद्युत रोषणाईचा झगमगाट!
08 Nov 2026
अनमोल आणि तन्वीची दुसर्या फेरीत धडक
05 Nov 2026
तांदळाच्या साठ्याची माहिती देणे आता बंधनकारक
07 Nov 2026
देशाची प्रगती पाहण्यासाठी सोनियांनी ’इटालियन चष्मा’ काढून टाकावा
08 Nov 2026
सावध होऊनी ऐका हाका
10 Nov 2026
बेकायदा वाहतुकीला आळा बसताच ‘लालपरी’ हाऊसफुल्ल!
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)