E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
विदेश
बांगला देशात कामगारांचे आंदोलन पेटले
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
गाझीपूरमध्ये पोलिस चौकीला आग; ढाक्यात वाहनांची जाळपोळ
ढाका : किमान वेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी बांगलादेशातील वस्त्रनिर्मिती कारखान्यांमधील कामगारांनी रविवारी पुन्हा आंदोलन केले. ढाक्यातील मीरपूर परिसरात आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात २० जण जखमी झाले. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, तर पोलिसांनी लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि ध्वनीग्रेनेडचा वापर करून जमावाला पांगवले. या आंदोलनादरम्यान पोलिसांचे वाहन पेटवण्यात आले. गाझीपूरमध्ये महामार्ग रोखून पोलिस चौकीला आग लावण्यात आली.
कामगारांचे सध्याचे किमान मासिक वेतन १२ हजार ५०० टका असून ते वाढवून ३० हजार टका (२३ हजार रुपये) करावे, अशी त्यांची मागणी आहे. वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खर्चामुळे सध्याचे वेतन अपुरे पडत असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. शनिवारीही ढाका, सावरमधील अशुलिया आणि गाझीपूर परिसरात आंदोलन झाले होते. त्याचा परिणाम औद्योगिक उत्पादनावर झाला असून अनेक कारखाने बंद ठेवण्यात आले.
रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मीरपूर-१० चौकात कामगारांनी रस्ता अडवला. त्यामुळे मीरपूर-१०, ११ आणि १२ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वारही बंद करण्यात आले. सकाळी सव्वाअकराच्या सुमारास संघर्ष सुरू झाला. पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केल्यानंतर झटापट व पाठलाग सुरू झाला.
मीरपूर-११ परिसरात उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनाला आग लावण्यात आली. दुपारनंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवून रस्ते मोकळे केले आणि वाहतूक पूर्ववत झाल्याची माहिती ढाका महानगर पोलिसांनी दिली.
गाझीपूरमध्ये ४५ कारखाने ठेवले बंद
गाझीपूरमधील कालीआकैअर परिसरात कामगारांनी ढाका-टांगाइल महामार्ग रोखला. कोनाबाडी येथील पोलिस चौकीला आग लावण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या. गाझीपूरमधील ४५ वस्त्र कारखान्यांनी रविवारी सुटी जाहीर केली.
सरकारकडून वेतन मंडळाची स्थापना
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारने वस्त्र उद्योगातील कामगारांचे किमान वेतन निश्चित करण्यासाठी सहा सदस्यीय वेतन मंडळ स्थापन केले आहे. कामगार आणि रोजगारमंत्री आरिफुल हक चौधरी यांनी रविवारी याची घोषणा केली.
Related
Articles
ऊसदराबाबत तिसर्या दिवशीही तोडगा नाही
06 Nov 2026
युक्रेनवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात 9 जखमी
08 Nov 2026
एनव्हिडियाच्या सीईओचे चिनी हेरासोबत संबंध
11 Nov 2026
दांडेकर पुलाजवळ उजव्या मुठा कालव्याला गळती
09 Nov 2026
जगभरातील बाजारात घसरण; सेन्सेक्सची उसळी कायम
07 Nov 2026
लक्ष्मीपूजनानिमित्त फुल बाजार बहरला
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)