E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
रामलीला मैदानावर विरोधकांचे शक्ती प्रदर्शन
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
लोकशाही वाचविण्याचे आवाहन
नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने रविवारी रामलीला मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन केले. विशेष मतदार यादी तीव्र पडताळणीला (एसआयआर) विरोध करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना पदावरुन हटविण्याची आणि केंद्रातील भाजप सरकार बदलून लोकशाही वाचविण्याचे आवाहन नागरिकांना केले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, राजदचे नेते तेजस्वी यादव, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, मार्क्सवादी पक्षाचे सरचिटणीस बेबी, कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा, सीपीआय(एमएल) लिबरेशन सरचिटणीस दिपांकर भट्टाचार्य यांच्यासह घटक पक्षांतील नेतेमंडळी उपस्थित होती. इंडिया आघाडीच्या महामेळाव्यात नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रारंभी इंडिया आघाडीच्या नेतेमंडळीनी उघड्या कंटेनरमधून प्रवास करत रामलीला मैदान गाठले. त्यांच्यासोबत कार्यकर्ते आणि नागरिक होते. सर्वजण मैदानावर पोहोचल्यानंतर महामेळावा आयोजित करण्यात आला. विविध नेत्यांनी एसआयआर प्रक्रियेत मतदारांची नावे गाळली जात असल्याचा आरोप करत सरकार आणि निवडणूक आयोग मतांची चोरी करत असल्याचे सांगितले.
लढा महाभारताप्रमाणे : तेजस्वी
राजदचे तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. देशात मतदार विरुद्ध फसवणूक करणारे असा लढा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या लढ्याची तुलना त्यांनी महाभारताशी केली.
पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले की, राज्यघटनेने नागरिकांना सरकार बदलण्याचा, पाडण्याचा आणि नवीन सरकार स्थापन करण्यासाठी मतदानाचा हक्क दिला आहे. तो हिसकावून घेतला जात आहेत.
कायद्यातून कुणीही सुटणार नाही : राहुल
राहुल यांनी सांगितले की, मतचोरी प्रकरणी ज्ञानेश कुमार यांना पदावरुन हटविले जाईल. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवत त्यांना तुरुंगात जाण्याची वेळ येईल. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना देखील भविष्यात कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागू शकतो. ते कायद्यातून सहजासहजी सुटणार नाहीत. मतदार यादीतील अनियमितता आणि एसआयआरमध्ये गोेंधळ निर्माण झाला असल्याचा आरोप करताना ते म्हणाले, महामेळाव्याच्या माध्यामतून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा आणि ज्ञानेश कुमार यांना संदेश दिला. शहा म्हणतात, मोदी कुठेही जाणार नाहीत. मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही कुठेही जावू नये. त्यांना जायचे असेल तर त्यांनी जावे. पण, आम्ही मात्र, त्यांना सोडणार नाही. मोदी आणि शहा यांच्यानंतर ज्ञानेश कुमार यांचा नंबर आहे, हे त्यांनी विसरु नये. आम्ही तुमच्याविरोधात उभे राहणार आहोत. तुमच्यावर नक्कीच कायदेशीर कारावाई केली जाईल. माझा धर्म कोणता? असा प्रश्न विचारल्यास नागरिकांचा आवाज हाच माझ धर्म आहे, असे मी सांगेन. मेळाव्यातील अलोट गर्दी पाहता हा राजकीय पक्षाचा अथवा नेत्यांचा आवाज नाही. तो तरुण, शेतकरी, मजुरांचा आहे. लोकशाही आणि राज्यघटना नष्ट करण्यापासून रोखण्यासाठी उठवलेला आवाज आहे. सत्ता आणि पैसा तुमच्याकडे नक्कीच आहे. पण, तुम्ही राज्यघटनेपेक्षा मोठे नाही आहात, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. मोदी, शहा आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कोणतेही हिंसक आंदोलन केले जाणार नाही., द्वेष पसरवला जाणार नाही. आम्ही कार्य आणि प्रेम करणारे आहोत. मात्र, राज्यघटना कधीही नष्ट करु देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मोदींना हटवा, लोकशाही वाचवा : खर्गे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी यांना हटवा आणि लोकशाही वाचवा, अशी मागणी भाषणात केली. ते म्हणाले, केंद्रातील आणि राज्यतील भाजपचे सरकार मताची चोरी करुन आले आहे. त्यामुळे लोकशाही वाचविण्यासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवरुन हटविण्याची गरज आहे.
सत्ता परिवर्तन निश्चित : अखिलेश
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, रामलीलाचे रुपांतर आता लोकशाहीच्या हल्दीघाटी मैदानातझाले आहे. महामेळाव्याला नागरिक मोठ्या संख्येने आले आहेत. त्यामुळे सत्ता परिवर्तन निश्चित आहे. जी मंडळी उत्तर प्रदेशातून केंद्रात सत्तेवर आली आहेत. त्यांना उत्तर प्रदेशातील मतदारच धडा शिकवून सत्तेवरुन पायउतार होण्यास भाग पाडतील.
ममतांचा ‘कॉक्रोच’ला पाठिंबा
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी कॉक्रोच जनता पार्टी आणि आंदोलन करणार्या तरुण पिढीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. एसआयआर राबवून मतदान यादीत फेरफार करण्याचे प्रकार घडले आहेत. त्या माध्यमातून विविध राज्यांतील विरोधी पक्षांची सरकार सत्तेवरुन हटविण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
Related
Articles
कोलंबियातील लष्करी तळावर ड्रोन हल्ला
09 Nov 2026
झेंडू व शेवंतीने भाव खाल्ला : आवक घटली
09 Nov 2026
वाचक लिहितात
04 Nov 2026
दूरगाव तलावातील पाण्याचा अनधिकृत उपसा थांबविण्याची मागणी
09 Nov 2026
आयुष अभ्यासक्रमाच्या तिसर्या यादीत
04 Nov 2026
जनुकीय फेरफार उत्पादनांना दुग्ध क्षेत्रात परवानगी नाही
04 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित