हॉटेलच्या चेंबरमध्ये गुदमरुन चार स्वच्छता कर्मचार्‍यांचा मृत्यू   

उज्जैनमधील घटना

उज्जैन : मध्य प्रदेशातील उजैन शहरातील हॉटेलच्या एका सांडपाणी चेंबरची स्वच्छता करताना चार कर्मचार्‍यांचा शनिवारी रात्री गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास केला जात आहे, अशी माहिती पोलिस अधिकार्‍यांंनी दिली. 
 
उज्जैन-देवास मार्गावरील हॉटेल श्री गंगामधील चेंबरमध्ये शनिवारी रात्री स्वच्छतेचे काम सुरू होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही दुदैवी घटना घडली. चार कर्मचार्‍याना वाचविण्यासाठी आणखी दोघे धावले होते,.तेही गुदमरुन बेशुद्ध पडले होते. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर ते  घरी परतले. कर्मचारी स्वच्छतेचे काम करण्यासाठी उतरले होते की, ते चेंबरमध्ये अपघाताने पडले? याचा तपास आता  केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. 
 
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबाींयाना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, चार कमर्ंचारी स्वच्छतेसाठी चेंबरमध्ये उतरले होते. ते तेथे अडकले नव्हते. गुदमरून त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बाहेर काढले,. त्याना तोंडाने श्वास दिला. मात्र, कोणतीही हालचाल दिसून आली नाही. चौघांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. 
 

Related Articles