रोहतकमध्ये भाजपची ‘लोकशाही वाचवा, अराजक हटवा’ पदयात्रा   

चंडीगढ : दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीच्या फेरीचे आयोजन करण्यात आले असताना, हरयानातील रोहतक येथे भाजपने ‘लोकशाही वाचवा, अराजक हटवा’ पदयात्रा काढली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पदयात्रेत मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते सहभागी झाले. या माध्यमातून भाजपने काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
 
रोहतक येथील छोटूराम पॉलिटेक्निक महाविद्यालयापासून सुरू झालेली पदयात्रा मॉडेल टाउनपर्यंत काढण्यात आली. पदयात्रेदरम्यान नितीन नवीन यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून जनता आपला निर्णय देते. जनतेने काँग्रेसला मतदान केले नाही, त्यामुळे काँग्रेस निराश झाला आहे. निवडणुकीतील पराभव स्वीकारण्याऐवजी काँग्रेस लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसमध्ये लोकशाहीऐवजी राहुल गांधी यांची घराणेशाही चालत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Related Articles