शीख धर्मीयांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी महामेळावा   

शहा यांची राहुल यांच्यावर टीका 

चंडीगड :  शीख धर्मीयांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी  रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचा महामेळावा आयोजित केला होता, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केली.
 
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये शीख धर्मीयांचे सामूहिक हत्याकांड झाले होते. त्या घटनेचा दिवस समोर ठेवत  महामेळावा आयोजित करण्यात आल्याचा आरोप शहा यांनी केला. इदिरा गांधी यांच्या हत्त्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले होते. तेव्हा विधान केले, की, मोठे झाड कोसळल्यानंतर धरणीकंप होते. त्यानंतर शीखांच्या हत्येचे सत्र आरंभले गेले होते. आज त्यांचा मुलगा राहुल यांनी हिसाचार घडला त्या दिवशीच नेमका दिल्लीत मेळावा आयोजित करुन शीख धर्मीयांच्या जखमांवर मीठ चोळले आहे, असे शहा यांनी सांगितले.

Related Articles