दोन अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश   

उत्तर प्रदेशातील मतदार यादीत फेरफार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील पिलिभीत मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार केल्याचे आरोप झाल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन निवडणूक नोंदणी अधिकर्‍यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. तसेच दोघांवर गुन्हा दाखल करण्यासही सांगितले. 
 
मयंक गोस्वामी आणि हेमंत चतुर्वेदी अशी अधिकार्‍यांची नावे आहेत. त्यांना निलंबित केले जात आहे, असे पत्र उत्तर प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकारी यांना आयोगाने पाठवले आहे. 
 
आरोपपत्राची प्रत आयोगाला छानीसाठी पाठवली आहे  आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांना कामावर रुजू करुन घेऊ नये, वरील दोन अधिकारी आणि मतदार नोंदणी कक्षातील संगणक चालक अनिल कुमार याच्यावरही गुन्हा दाखल करावा ,असेही पत्रात नमूद केले. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने मतदार यादीत मोठा गोंधळ झाला असल्याचा  आरोप केला होता. त्यानंतर वादाला तोंड फुटले होते. 
 
या गंभीर प्रकाराची दखल निवडणूक आयोग आणि उत्तर प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकाी नवदीप रिनवा यांनी घेतली होती. त्यनंतर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
 

Related Articles