E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
मनोरंजन ,महाराष्ट्र
ज्येष्ठ साहित्यिक, दिग्दर्शक वेद राही यांचे निधन
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, पटकथाकार आणि दिग्दर्शक वेद राही यांचे रविवारी सकाळी ठाणे येथे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली गीतांजली आणि पूनम, असा परिवार आहे.
डोगरी आणि हिंदीतील प्रख्यात लेखक आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, पटकथा लेखक अशी त्यांची ओळख होती. सुमारे २५ हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा आणि संवाद लिहिले. ये रात फिर ना आएगी, पवित्र पापी, बेइमान, मेणाची बाहुली, सन्यासी, चरस यांचा समावेश होता. प्रेम पर्वत, दरार, अंधी सुरंग, डोगरी चित्रपट बोबो, काली घटा (१९८०, रेखा-शशी कपूर) या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. त्यांच्या दूरदर्शन मालिका गाजल्या. त्यामध्ये गुल गुलशन गुलफाम (१९८७, ४५ भाग, एका काश्मिरी कुटुंबाची कथा), मीराबाई मालिका; वीर सावरकर (२००१) यांचा समावेश होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्र गौरवने सन्मानित केले होते. कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार, महा पंडित राहुल सांकृत्यायन पुरस्कार, जम्मू आणि काश्मीर जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.
Related
Articles
निर्देशांकात काहीशी वाढ
09 Nov 2026
अभिनेता इम्रान याचा माफीनामा!
03 Nov 2026
पोलंड गोळीबारातील हल्लेखोराचा मृत्यू
09 Nov 2026
ऊस दर जाहीर करण्यासाठी कारखानदारांना प्रशासनाचा तीन दिवसांचा अल्टिमेटम
04 Nov 2026
लक्ष्मीपूजनाच्या साहित्याने बाजारपेठ सजली
08 Nov 2026
तोतया निवडणूक निरीक्षक जाळ्यात
03 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित