E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महाराष्ट्र
बंगालच्या उपसागरात ‘मुरासू’ चक्रीवादळ तीव्र
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
महाराष्ट्रातही पावसाचा इशारा
मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे ‘मुरासू’ चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ अधिक तीव्र होऊन मंगळवारी पहाटे आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा थेट फटका आंध्र प्रदेशला बसण्याचा अंदाज असला, तरी त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामानातही बदल होणार आहेत. राज्यातील काही भागांत ५ नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता असून, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्यांचा इशारा देण्यात आला आहे. मुरासू चक्रीवादळ बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य आणि पश्चिम-मध्य भागात सक्रिय आहे. हे वादळ आणखी तीव्र होऊन अतितीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. २ नोव्हेंबरच्या रात्रीपासून ३ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत नेल्लोर ते नरसापूरदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ते धडकू शकते.यावेळी वार्यांचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर, तर वार्यांच्या झोतांचा वेग ताशी १२० किलोमीटरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या भागांत पावसाचा अंदाज?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ४ नोव्हेंबरपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वार्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर, तर झोतांचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. २ आणि ३ नोव्हेंबर रोजी कोकण आणि गोवा परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात ३ नोव्हेंबरला काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. विदर्भातही काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता असून, पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला अधिक धोका
मुरासू चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत अतिवृष्टी होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ओडिशाच्या दक्षिण भागातही ३ आणि ४ नोव्हेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Related
Articles
वाचक लिहितात
09 Nov 2026
रब्बी पेरण्यांचा वेग मंदावला
04 Nov 2026
डिसेंबरमध्ये बांगला देशात परतणारच
06 Nov 2026
पीएलएच्या दहशतवाद्याला अटक
07 Nov 2026
कास पठार परिसरात जखमी रानगव्याचा वावर
07 Nov 2026
पुणेकरांसाठी छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे प्रदर्शन
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित