E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महाराष्ट्र
आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली अॅलोपॅथिक औषधांची भेसळ
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
८९ हजारांचा औषधसाठा जप्त; केंद्र चालकासह अन्य एकावर गुन्हा
सातारा, (प्रतिनिधी) : आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली अॅलोपॅथिक औषधांची भेसळ करून बनावट औषधांची निर्मिती व विक्री केल्याच्या गंभीर प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. पाटण तालुक्यातील विहे येथील वनगंगा आयुर्वेदिक पंचगव्य व निसर्गोपचार केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत सुमारे ८९ हजार ७६० रुपयांचा संशयित औषधसाठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी केंद्राचे चालक-मालक सचिन ज्ञानदेव जाधव (वय-४६, रा. शिद्रुकवाडी खळे, ता. पाटण जि. सातारा) आणि हडपसर, पुणे येथील मे. देव फार्माचे प्रोप्रायटर अशोक देविचंद कोठारी (वय-६३, रा. सेंटर स्ट्रीट, भोपळे चौकाजवळ पुणे) यांच्यासह अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक मनोज नंदकुमार अय्या यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विहे येथील वनगंगा आयुर्वेदिक केंद्रात विनापरवाना औषधनिर्मिती सुरू असल्याची तसेच आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली अॅलोपॅथिक औषधांची भेसळ केली जातअसल्याची तक्रार प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार २४ जुलै रोजी दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत दोन पंचांच्या उपस्थितीत वनगंगा आयुर्वेदिक केंद्रात छापा टाकण्यात आला होता. छाप्यादरम्यान कोणतेही लेबल नसलेल्या हिरव्या रंगाच्या गोलाकार गोळ्यांचा सुमारे ३० किलो साठा आढळून आला. या गोळ्यांची संख्या अंदाजे ३० हजार असून त्यांची किंमत ३० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय अॅलोपॅथिक औषधाची ९९६ पाकिटे, म्हणजेच ९९ हजार ६०० गोळ्यांचा साठा आढळून आला. त्याची किंमत ५९ हजार ७६० रुपये आहे. असा एकूण ८९ हजार ७६० रुपयांचा संशयित औषधसाठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या हिख्या रंगाच्या गोळ्यांचे नमुने शासकीय विश्लेषकांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेच्या २८ ऑगस्ट रोजीच्या अहवालानुसार, आयुर्वेदिक म्हणून भासविण्यात आलेल्या गोळ्यांमध्ये अॅलोपॅथिक वेदनाशामक घटकांची भेसळ आढळून आली. या निष्कर्षामुळे संबंधित औषधे बनावट व दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पुण्यातील औषध विक्रेत्याचीही चौकशी...
या प्रकरणातील औषधांचा पुरवठा पुण्यातील हडपसर येथील देव फार्मा या घाऊक औषध विक्री पेढीतून झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे म्हटले आहे. औषध निरीक्षकांनी १४ ऑक्टोबर रोजी देव फार्मा येथे तपासणी केली असता, मे ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे ४ लाख २१ हजार २४८ रुपये किमतीच्या विविध अॅलोपॅथिक औषधांच्या खरेदी-विक्री नोंदी आढळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Related
Articles
‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून क्रीडा संस्कृती गावागावांत : मुख्यमंत्री
04 Nov 2026
गोकुळ ब्रँड ‘अमुल’च्या घशात घालण्याचा महायुतीचा कुटील डाव
06 Nov 2026
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
08 Nov 2026
मुंबईच्या एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात मृत्यू
06 Nov 2026
राष्ट्रवादी अजित पवार गटात दुफळी...!
03 Nov 2026
‘एसआयआर’नंतर पाच राज्यांत सव्वादोन कोटी मतदार घटले
03 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित