E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महाराष्ट्र
अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
पिंपळवंडी, पिंपरी पेंढार भागात द्राक्षबागांवर रोग-किडीचे संकट
बेल्हे, (वार्ताहर) : परिसरात तब्बल महिनाभराच्या उघडिपीनंतर शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला,तरी द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत मात्र मोठी भर पडली आहे. आळेफाटा परिसरातील पिंपळवंडी, पिंपरी पेंढार परिसरा सह आसपासच्या द्राक्ष पट्ट्यात पावसामुळे आर्द्रता वाढल्याने द्राक्षवेलीवर घडकूज,तुडतुडे,रसशोषक किडी तसेच डावणी व विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शुक्रवारी रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यात सरासरी ८.४ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाने काही भागातील शेतकर्यांना दिलासा मिळाला असला, तरी सध्या फुलोरा, पोंगा आणि घडनिर्मितीच्या अवस्थेत असलेल्या द्राक्षबागांसाठी हा पाऊस प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे. यामुळे शनिवारी सकाळपासूनच शेतकर्यांनी द्राक्षबागांची पाहणी सुरू केली. दुपारनंतर अनेक शेतांमध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोग व किडींच्या प्रतिबंधासाठी फवारणीची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली.
जुन्नर तालुक्यात सुमारे तीन हजार एकर क्षेत्रावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. यंदा अनेक बागांमध्ये समाधानकारक घडनिर्मिती झाल्याने उत्पादकांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, अवेळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे या आशांवर पुन्हा पाणी फिरण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, ज्या द्राक्षबागांची छाटणी २५ सप्टेंबरच्या आसपास झाली आहे, त्या बागा सध्या फुलोरा अवस्थेत आहेत, तर १५ ऑक्टोबरनंतर छाटणी झालेल्या बागा पोंगा अवस्थेत आहेत. या संवेदनशील अवस्थेत पावसामुळे बागांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी खबरदारी घेत आहेत.
अवेळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांना आता अतिरिक्त फवारणीचा खर्च सहन करावा लागत आहे. पुढील दोन-तीन दिवस हवामानाची परिस्थिती पाहून वारंवार फवारणी करावी लागू शकते. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार असल्याची चिंता शेतकर्यांनी व्यक्त केली. यंदा बागांमध्ये घडनिर्मिती चांगली झाली आहे.मात्र पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे रोग-किडीचा धोका वाढला आहे. पुढील काही दिवस बागांचे व्यवस्थापन अत्यंत काळजीपूर्वक करावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया द्राक्ष उत्पादकांनी दिली.
आळेफाटा परिसरातील पिंपळवंडी, पिंपरी पेंढार आणि परिसरात पावसानंतर शेतकर्यांची बागांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. कुठे ट्रॅक्टरद्वारे फवारणी सुरू आहे, तर कुठे शेतकरी वेलींची पाहणी करून रोगाची लक्षणे तपासत आहेत. मागील वर्षी घडनिर्मितीअभावी अनेक द्राक्ष उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यंदा घडनिर्मिती समाधानकारक झाल्याने शेतकर्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.त्यामुळे सध्याचे प्रतिकूल हवामान द्राक्ष उत्पादकांसाठी‘आनंदावर विरजण’ घालणारे ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान पुढील काही दिवस पाऊस,ढगाळ वातावरण आणि आर्द्रता यांचे प्रमाण कसे राहते, यावर द्राक्ष हंगामाचे भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.
Related
Articles
काँग्रेसच्या देणग्या ७५ टक्क्यांनी घटल्या
09 Nov 2026
कास पठार परिसरात जखमी रानगव्याचा वावर
07 Nov 2026
इस्रायलला शस्त्रखरेदीसाठी निधी देणार नाही
06 Nov 2026
देवगड हापूसच्या एका पेटीला 41 हजारांचा दर
09 Nov 2026
भारतीय जहाजांसाठी होर्मुझचा मार्ग खुला
06 Nov 2026
शेतकरी, महिलांकडून सक्तीने कर्जवसुली नको
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)