E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
अर्थ
जिओचा पायगुण?
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
धनंजय दिक्षित
dhananjay@kalyanicapital.com
२३ ऑक्टोबर रोजी व्यवहाराच्या अखेरच्या सत्रात तेजीवाल्यांनी मुसंडी मारून २२,५०० ही निफ्टीची मानसिक आधार पातळी राखली होती. निफ्टीचा बंद भाव २२,६०० ठेवण्यात आणि तेजीचा झेंडा फडकावत ठेवण्यात त्यांना यश आले होते.
३० ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यातील पहिले तीन दिवस तर जिओ प्लॅटफॉर्म्सला समर्पित असल्यासारखे होते. जिओची अलॉटमेंट, लिस्टिंगची प्रतीक्षा मग लिस्टिंग. आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ (३०,२१३ कोटी रुपये), अवघ्या १०० सबस्क्राइब झालेला आयपीओ, सर्वात जास्त अॅप्लिकेशन्स (३०.५० लाख) असलेला आयपीओ आणि एवढे असून बुधवारी आयपीओ किमतीच्या चक्क २१% वर उघडून (१३५८), १४१७.५० म्हणजे २६.६७% बंद झाला (बाजार मूल्य १३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त)
समर्थाघरच्या शेअरला सर्वच देती मान!
अर्थात जिओ व्यतिरिक्त सुद्धा बाजारातल्या इतर शेअर्समध्ये तेजीचे संकेतच दिसून येत होते, खास करून आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये. सध्यातरी या शेअर्सना बर्याच महिन्यांनी चांगले दिवस आले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एआयची जी प्रचंड हवा निर्माण झाली होती, त्याला जरा खीळ बसल्यासारखी वाटते आहे. ३० तारखेलाच इंटेल आणि अॅमेझॉन यांच्या निराशाजनक तिमाही निकालांमुळे नॅसडॅकमध्ये बरीच पडझड झाली - एआयवर खर्च होणारे पैसे आणि त्यामधून अपेक्षित असणारा परतावा यात खूपच तफावत गुंतवणूकदारांना जाणवू लागली आहे.
म्हणजे एआयमुळे कितीतरी माणसांचा पगाराचा खर्च वाचून कैकपट उत्पादकता साध्य करता येईल हे प्राथमिक गृहीतक आता डळमळीत होऊ लागलंय असे दिसतंय. असो...तर या सगळ्यामुळे भारतीय आयटी कंपन्या, ज्या एआय आधारित काहीच करत नाहीत म्हणून वाळीत टाकल्या गेल्या होत्या त्या इतक्या वाईट नाहीत म्हणून गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरत आहेत.
आलेख शास्त्राच्या मते, आता जर निफ्टी २३,१४० च्या पातळीवर ठेवण्यात तेजीवाल्यांना यश आले, तर निफ्टीची पुढची उडी साधारणतः ५४० अंक व तिथे विसावा घेऊन आणखी ३६९ अंक म्हणजे एकूण ९०९ अंक वर अशी असू शकते; परंतु शेअर बाजार हा महाभारतातील मयसभेप्रमाणे आहे... आणि आपण नेहमीच दुर्योधनाच्या रोलमध्ये...त्यामुळे पाऊल जपून टाकलेलेच बरे. नाही का?
जुलै ते सप्टेंबर २०२६ या आर्थिक तिमाहीसाठीचे निकाल जाहीर होत आहेत. त्यापैकी या आठवड्यामध्ये जाहीर होणार्या काही प्रमुख कंपन्यांच्या निकालांच्या तारखा खालीलप्रमाणे:
आज : आयटीसी, मॅरिको, नाल्को, पेट्रोनेट, कॉन्कोर, एस्कॉर्ट्रस, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्प, ग्रॅन्युल्स इंडिया, कार्बोरंडम, फाइन ओर्गानिक्स, अमरा राजा, पी अँड जी हेल्थ, जीएनएफसी, जेकेपेपर, सनफार्मा ऍडवान्सड, युरेका फोर्ब्स, निरलॉन, जीएसएफसी
उद्या : एनएसई, बजाज फिनसर्व, बजाज होल्डिंग्ज, लुपिन, एमसीएक्स, ग्लॅक्सो फार्मा, एम्क्युर फार्मा, ग्लोबल हेल्थ, एन्ड्युरन्स, न्यूलँड लॅब्स, बायर क्रॉप, चंबळ फर्ट, झायडस वेलनेस, फ्रॅक्टल अॅनॅलिटिक्स, एएसके ऑटो, अल्कायल अमायन्स, बाटा इंडिया, टायमेक्स ग्रुप
४ नोव्हेंबर : बीएसई, कमिन्स, झायडस लाइफ, लेन्स्कार्ट, अपोलो हॉस्पिटल, एनएचपीसी, डाबर, डॉ लालपाथलॅब, एक्साइड, गार्डनरीच, कन्साई नेरोलॅक, सेंच्युरी प्लाय, बीएएसएफ, मार्क्सन्स फार्मा, जे एस डब्ल्यू ड्युलक्स, जेएम फिनान्शिअल, ऍपटस व्हॅल्यू, सारेगामा इंडिया
५ नोव्हेंबर : एलआयसी, टायटन, एम एन्ड एम, ओएनजीसी, मदरसन, ब्रिटानिया, ग्लेनमार्क, बर्जर पेंट्स, इप्का लॅब्स, एम्फसिस, थरमॅक्स, साई लाइफ सायन्स, गुज एनर्जी, एनबीसीसी, एनसीसी
६ नोव्हेंबर : हिंडाल्को, बॉश, ग्लॅन्ड फार्मा, थ्री एम इंडिया, एलजी इक्विपमेंट, होनासा, बॅन्को प्रॉडक्ट्स, टीटीके प्रेस्टिज, रेन इंडस्ट्रीज, वेस्ट कोस्टपेपर, फोसेको इंडिया.
(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)
Related
Articles
झुंजार अन् जिगरबाज!
08 Nov 2026
पेट्रोलमधील इथेनॉलच्या प्रमाणावरून नवा वाद?
08 Nov 2026
लखनौ-आग्रा महामार्गावर भीषण अपघात
09 Nov 2026
बंगळुरूमध्ये कॅब चालकाने कुटुंब संपविले
07 Nov 2026
शेवगाव तालुक्यात ३५ गावांना २८ टँकरद्वारे पाणीपुरवठा
05 Nov 2026
शौर्या अंबुरेची ऐतिहासिक कामगिरी
10 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)