E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
गुन्हेगारी जगत
तीस लाखांचा दरोडा; दोन आरोपी अटकेत
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
२४ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : सॅलेसबरी पार्क परिसरात पाच लाख रुपयांची रोकड लुटण्याच्या प्रयत्नात एका व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जखमी करणार्या टोळीवर स्वारगेट पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पाच लाखांची लूट करण्यात अपयश आल्यानंतर याच आरोपींनी साथीदारांच्या मदतीने मार्केटयार्ड परिसरात एका व्यापार्याची ३० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून मोटार, दुचाकी, मोबाइल, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी हे २३ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास पाच लाख रुपयांची रोकड घेऊन जात असताना सॅलेसबरी पार्क येथील गोलीवाला भवन परिसरात तिघांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर संगनमताने धारदार लोखंडी हत्याराने वार करून त्यांना जखमी केले आणि त्यांच्याकडील बॅगेतील पाच लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न केला होता.
या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम यांनी तपास पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल शेळके, पोलिस उपनिरीक्षक बाळू शिरसट आणि पोलिस अंमलदार अक्षय भोगे यांनी तपास सुरू केला. घटनास्थळासह मार्केटयार्ड, बिबवेवाडी, वानवडी, कोंढवा, हडपसर, मगरपट्टा सिटी, केशवनगर आणि मुंढवा परिसरातील सुमारे ३०० ते ३५० सीसीटीव्ही कॅमेर्यांचे महिनाभरातील फुटेज तपासण्यात आले. त्यातून संशयित आरोपींची ओळख पटवून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान एक संशयित मुंढवा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला राहत्या घराजवळून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. याप्रकरणी यश प्रविण सोनवणे (वय-२४, रा. मांजरी रोड, मांजरी) आणि निहाल नवनाथ अडागळे (वय-१९, रा. राजगे आळी, मुंढवा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह आणखी एका साथीदाराचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला आहे.
विशेष म्हणजे, सॅलेसबरी पार्क येथील पाच लाख रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न फसल्याने आरोपींनी पुन्हा तीन साथीदारांच्या मदतीने ७ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास मार्केटयार्ड रस्त्यावर एका व्यापार्याची ३० लाख रुपये असलेली बॅग दरोडा टाकून लुटल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली वाहने, कपडे आणि दोन मोबाइल जप्त केले आहेत. तसेच दरोड्यातून मिळालेल्या पैशांतून खरेदी केलेली एक आय-२० मोटार, एक बुलेट दुचाकी, अॅपल आयफोन १८ प्रो, साडेचार तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे तोडे, दोन अॅपल वॉच, एक महिलांचे घड्याळ आणि सहा लाख ५० हजार रुपये रोख असा २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Related
Articles
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला चांगला प्रतिसाद
07 Nov 2026
सिंधू वर्ल्ड टूर फायनल्ससाठी पात्र
05 Nov 2026
श्वानाची मुलावर झडप; मुलगा जखमी
06 Nov 2026
७३ लाख दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात ५ हजाराची मदत जमा
05 Nov 2026
वेस्ट इंडिजची कसोटी सामन्यावर मजबूत पकड
09 Nov 2026
रब्बी पेरण्यांचा वेग मंदावला
04 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित