E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
पर्वती ते तळजाई टेकडी रोपवे हवा; सारसबाग-पर्वती नको
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
पुणे : पुणे शहरात रोपवे सुरू करण्याची संकल्पना ही पर्यटनाच्या दृष्टीने निश्चितच स्वागतार्ह असून, पुण्याच्या पर्यटन विकासाला चालना देणारा हा एक चांगला प्रकल्प ठरू शकतो. पुण्यात रोपवे सुरू करण्याची संकल्पना सर्वप्रथम दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांनी मांडली होती. त्यामुळे पुण्यात रोपवे व्हावा, ही भूमिका निश्चितच सकारात्मक आहे. मात्र, सारसबाग ते पर्वती असा रोपवे करण्याचा प्रस्ताव व्यवहार्य वाटत नाही. या प्रस्तावाचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे.
सारसबाग आणि पर्वती हा परिसर पुणे शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक, पर्यटक आणि भाविकांची ये-जा असते. त्यातच या परिसरात सध्या पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत रोपवे प्रकल्प झाल्यास वाहनांची संख्या आणि पर्यटकांची गर्दी आणखी वाढून वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.
विशेषतः स्वारगेट हे पुण्याचे महत्त्वाचे मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब आहे. मेट्रो, बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे या परिसरात आधीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. अशा ठिकाणी रोपवे प्रकल्पामुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. तसेच बाजीराव रस्त्यावरील वाहतूक आणि पुण्यातील मध्यवर्ती पेठांमध्ये जाण्यासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग असल्याने या परिसरातील रस्ते मोकळे राहणे अत्यंत गरजेचे आहे.
याशिवाय, रोपवे उभारणी करताना आवश्यक असणार्या तांत्रिक बाबी, उपलब्ध जागा, प्रवाशांची सुरक्षितता, पार्किंग, वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यावरणीय परिणाम यांचाही सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करता, सारसबाग ते पर्वती या मार्गाऐवजी तळजाई टेकडी ते पर्वती असा रोपवे उभारण्याचा पर्याय अधिक योग्य ठरू शकतो. तळजाई टेकडी परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा आणि रोपवेच्या उभारणीसाठी जागेच्या उपलब्धतेचा विचार करता या पर्यायाचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करावा. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीवरील अतिरिक्त ताण टाळता येईल, पार्किंगचा प्रश्न कमी होईल आणि पर्यटकांनाही रोपवेचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर पुण्याच्या पर्यटन विकासालाही नवी दिशा मिळू शकेल.
Related
Articles
पद्मावती मेट्रो स्थानकासाठी महापालिका देणार 665 चौरस मीटर जागा
06 Nov 2026
संवत्सर संपेपर्यंत लक्ष्मीची ’पूजा अर्चा’ करा
09 Nov 2026
बनावट चित्रफित प्रकरणी प्रशांत भूषण यांच्यावर गुन्हा
05 Nov 2026
दूरगाव तलावातील पाण्याचा अनधिकृत उपसा थांबविण्याची मागणी
09 Nov 2026
सोलापुरात आज 'आरोग्य संवाद यात्रा'
04 Nov 2026
बंगळुरूमध्ये कॅब चालकाने कुटुंब संपविले
07 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित