E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
पुणे रेल्वे स्थानकावर आरपीएफचा कडेकोट बंदोबस्त
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
पुणे : दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत चोरी, दगडफेक आणि अन्य गुन्हेगारी प्रकार घडविण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. दररोज सुमारे तीन लाख प्रवाशांची ये-जा अपेक्षित असल्याने रेल्वे सुरक्षा दलाने बंदोबस्तात वाढ केली आहे. स्थानकातील १७० सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे चोवीस तास नजर ठेवली जात असून, रेल्वे यार्डातील संवेदनशील ठिकाणांवर ड्रोनद्वारे गस्त घातली जात आहे.
स्थानकावरील प्रवाशांची गर्दी, संशयित व्यक्तींच्या हालचाली आणि संभाव्य गुन्हेगारी प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. सर्व फलाटांवर चोवीस तास गस्त घालण्याबरोबरच अतिरिक्त जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे यार्डात ड्रोनचा वापर करून विशेष निगराणी ठेवली जात आहे. नाइट व्हिजन कॅमेरे असलेल्या ड्रोनच्या माध्यमातून रात्रीच्या वेळीही संशयास्पद हालचाली टिपल्या जात आहेत. रेल्वे मालमत्तेची चोरी, रेल्वे रुळांवरून अनधिकृतपणे मार्गक्रमण करणे आणि धावत्या गाड्यांवर दगडफेक होणार्या संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आठवड्यातून तीन ते चार दिवस रात्रीच्या वेळी विविध सत्रांत ड्रोनद्वारे गस्त घातली जात आहे. स्थानकावरील छत आणि ओव्हरहेड विद्युत तारांमुळे फलाटांवर ड्रोन उडविणे शक्य नसल्याने यार्ड आणि मोकळ्या जागांमध्ये त्याचा वापर केला जात आहे.
१७० कॅमेर्यांतून संशयितांवर नजर
रेल्वे स्थानकावर १७० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत. १५ ऑक्टोबरपासून विभागीय नियंत्रण कक्षातून स्वतंत्र पथकाद्वारे चोवीस तास सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण केले जात आहे. एखाद्या फलाटावर किंवा प्रवेशद्वारावर अचानक गर्दी वाढल्यास अथवा संशयास्पद हालचाल आढळल्यास संबंधित अधिकार्यांना तातडीने सतर्क केले जाते. यासाठी रेल्वे अधिकार्यांचे स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळणार्या माहितीच्या आधारे तातडीने सुरक्षा यंत्रणेला अलर्ट देऊन संभाव्य अनुचित प्रकार रोखण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Related
Articles
यूँ ही चला चल राही
06 Nov 2026
खुशबूचे ज्युदोमध्ये पदक निश्चित ; धिनिधीची अंतिम फेरीत धडक
03 Nov 2026
‘भाजपची लोकशाही व राज्यघटना बचाव मोहीम दिशाभूल करणारी’
03 Nov 2026
13 टीएमसीचा कालावधी नोव्हेंबरपासून हवा
06 Nov 2026
आंध्र प्रदेशाला ‘मुरासू’ चक्रीवादळाचा तडाखा
04 Nov 2026
सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेत आणखी सुधारणा करा
04 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित