E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
विद्युत बिघाडामुळे शहरातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
महापालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण
पुणे : आधीच पाणीकपात आणि त्यातून विद्युत बिघाडामुळे शहरातील काहीभागातील पाणीपुरवठा जवळपास तीन दिवस विस्कळीत झाला. पंपिंग स्टेशन आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांमधील विद्युत बिघाडामुळे शहरातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय आल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
‘एमएसईडीसीएल’च्या वीजपुरवठा पायाभूत सुविधा आणि महापालिकेच्या विद्युत उपकरणांमध्ये झालेल्या विद्युत बिघाडांच्या मालिकेमुळे, गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहरातील अनेक भागांमधील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. यामुळे विविध भागांतून पाणीपुरवठा उशिरा होत असल्याच्या आणि कमी दाबाच्या तक्रारी येत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
या सगळ्या सलग व्यत्ययामुळे आणि त्यानंतर झालेल्या विद्युत बिघाडामुळे शहरातील विविध भागांतील पाणीपुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाला. यामध्ये सर्व पेठ परिसर, स्टेशन परिसर, खराडी, वडगाव शेरी, भांडारकर रोड, कोथरूडचे काही भाग, कर्वे नगर, शिवाजीनगर, औंध आणि इतर बाधित परिसर यांसह अनेक भागांतून कमी दाब आणि पाणीपुरवठ्यात विलंब झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या.
२९ ऑक्टोबरला नियोजित पाणीपुरवठा बंद होता. ३० ऑक्टोबरला पर्वती जलशुद्धीकरण प्रकल्पात विद्युत केबल बिघाड झाल्याने चार तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. चार तासांच्या आत दुरुस्ती करून पाणी शुद्धीकरण आणि पुरवठा कार्य सुरू करण्यात आले. ३१ ऑक्टोबरला खडकवासला पंपींग स्टेशनवर वीजपुरवठा खंडीत झाला. येथे नांदेड शहरातून खडकवासला पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करणारा एमएसईडीसीएलचा एक्सप्रेस फीडर, सुरू असलेल्या बांधकाम कामादरम्यान खराब झाला होता,
एमएसईडीसीएलने तत्काळ ‘अर्बन ग्राम एक्सप्रेस फीडर’ मार्फत पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था केली; परंतु हा फीडर ओव्हरहेड पॉवर लाइन्सद्वारे चालत असल्याने, एका माकडाचा धक्का लागल्याने शॉर्ट सर्किट झाले आणि वीजपुरवठ्यात पुन्हा एकदा व्यत्यय आला. एमएसईडीसीएलने शॉर्ट-सर्किटचा बिघाड तात्काळ दुरुस्त केला असला तरी विद्युत बिघाडामुळे खडकवासला पंपिंग स्टेशनमधील दोन ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याचे त्यानंतरच्या तपासणीत दिसून आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
शहराच्या पाणीपुरवठ्यातील व्यत्यय कमी करण्यासाठी, आपत्कालीन डीजी सेट तात्काळ कार्यान्वित करण्यात आले. या व्यवस्थेमुळे वारजे जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे होणारा ‘रॉ’ पाण्याचा उपसा सुमारे ८० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात आला, यासाठी पाचपैकी चार पंप कार्यान्वित होते.
त्याचबरोबर, खराब झालेले ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्याचे प्रयत्न करण्यात आले. तथापि, तात्काळ दुरुस्ती शक्य नसल्यामुळे ठेकेदाराकडून ट्रान्स्फॉर्मर भाडेतत्त्वावर घेऊन ते कार्यान्वित करण्यात आले त्यामुळे रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सामान्य वीजपुरवठा आणि उपसा कार्य पुन्हा सुरू झाल्याचे प्रशासनाने सांगितले. सणाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Related
Articles
लक्ष्मीपूजनानिमित्त व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये वहीपूजनाचा उत्साह
09 Nov 2026
त्रिपुरात पथकावरील हल्ल्यानंतर बीएसएफची आक्रमक कारवाई
09 Nov 2026
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
05 Nov 2026
रिंकू सिंहची उपकर्णधारपदी नियुक्ती
09 Nov 2026
मनू भाकर, सुरुची अंतिम फेरीत
06 Nov 2026
खडकवासला धरणसाखळीत 80.65 टक्के पाणीसाठा
03 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित