E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
२६ लाख पशुधनासाठी २५ लाख टन चारा उपलब्ध
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
अहिल्यानगर : जिल्ह्यातील २६ लाख १५ हजार ७०६ पशुधनासाठी सध्या २५ लाख २६ हजार २८७ मेट्रिक टन चारा उपलब्ध असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. उपलब्ध चारा जनावरांना दीड ते दोन महिने पुरेल, असा अंदाज आहे. मात्र, अहिल्यानगर, पारनेर, पाथर्डी आणि जामखेड तालुक्यांमध्ये चार्याचा साठा तुलनेने कमी असल्याने प्रशासनासमोर नियोजनाचे आव्हान निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात १३ लाख १९ हजार ९०६ मोठे पशुधन, एक लाख ७९ हजार ८९७ लहान पशुधन, तर ११ लाख १५ हजार ८१३ शेळ्या-मेंढ्या आहेत. दररोज या पशुधनासाठी २९ हजार ८४१ मेट्रिक टन चार्याची, तर महिन्याला सुमारे ८ लाख ९५ हजार २४३ मेट्रिक टन चार्याची आवश्यकता असते.
उपलब्ध साठ्यामध्ये ८ लाख ३८ हजार ५१८ मेट्रिक टन मुरघास, ४ लाख ७५ हजार ९६९ मेट्रिक टन हिरवा चारा आणि २ लाख ४१ हजार ६०४ मेट्रिक टन वाळलेला चारा आहे. खरीप हंगामात चारा उत्पादन वाढविण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीतून २१ हजार ८४ पशुपालकांना एक लाख ९५ हजार ३२६ किलो चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान, ’व्हीबी-जी रामजी’ योजनेतून वैयक्तिक व सामूहिक चारा लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. धरणे व तलावांच्या गाळपेर क्षेत्रातही चारा उत्पादनाचे नियोजन आहे. तसेच निकृष्ट कोरड्या चार्यावर युरिया प्रक्रिया, उसापासून मुरघास निर्मिती आणि हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादनासाठी प्रयत्न सुरू आहेत. चार्याची टंचाई निर्माण झाल्यास चारा छावण्या किंवा डेपो सुरू करण्यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे.
Related
Articles
वेस्ट इंडिजची कसोटी सामन्यावर मजबूत पकड
09 Nov 2026
दिल्लीच्या चावडी बाजारमध्ये ३ मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू
05 Nov 2026
कॅब चालकाकडून हत्या; सातही मृतदेह हाती
09 Nov 2026
सरफराज खानची निवड प्रक्रियेवर नाराजी
03 Nov 2026
देवगड हापूसच्या एका पेटीला 41 हजारांचा दर
09 Nov 2026
किरकोळ वादातून मुलाकडून वडिलांचा खून
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित