बुद्धिबळाचा डाव खेळणार चीनचा रोबोट   

अहिल्यानगर :  बुद्धिबळप्रेमींसाठी पर्वणी ठरणारी शांतीकुमारजी फिरोदिया अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धा ११ नोव्हेंबरपासून लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, बसस्थानक रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे मुख्य आकर्षण चीनमधून येणारा अत्याधुनिक बुद्धिबळ रोबोट असून, तो प्रत्यक्ष खेळाडूंशी डाव खेळणार आहे.
 
जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी ही माहिती दिली. गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा, तमिळनाडू, तेलंगणा आदी राज्यांतील २०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग निश्चित केला आहे. साडेचार वर्षांच्या बालकापासून ८७ वर्षांच्या ज्येष्ठ खेळाडूपर्यंत विविध वयोगटांतील स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेत नऊ फेर्‍या होणार असून पाच लाखांची रोख पारितोषिके व ७० करंडक देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे आयोजन अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles