शिर्डी (वार्ताहर) : श्री साईबाबांच्या चरणी दुबई आणि मुंबई येथील साईभक्तांनी प्रत्येकी एक अशी दोन सुवर्ण स्वस्तिके श्रद्धापूर्वक अर्पण केली. दुबई येथील भक्ताने ८२ ग्रॅम, तर मुंबई येथील भक्ताने ८० ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्ण स्वस्तिक दान केले. या दोन्ही स्वस्तिकांची एकूण किंमत २० लाख ६१ हजार ६१२ रुपये आहे. ही सुवर्ण स्वस्तिके साईबाबांच्या मूर्तीशेजारील मागील भिंतीवर बसविण्यात आली आहेत. देणगीदारांच्या विनंतीनुसार त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साईभक्तांचा सत्कार करण्यात आला.
Fans
Followers