E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
दुष्काळात हार्वेस्टरचा फटका; पशुधनाच्या चार्याचा प्रश्न
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
शेवगाव (वार्ताहर) : यंदा पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच ऊसतोडीसाठी हार्वेस्टरचा वाढता वापर पशुधनाच्या चारा संकटात भर घालत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
पूर्वी मजुरांकडून हाताने ऊसतोड केली जात असल्याने जनावरांना हिरवे ऊसवाढे उपलब्ध होत होते. मात्र, हार्वेस्टरद्वारे ऊसतोड करताना वाढ्यांचा बारीक भुगा होत असल्याने जनावरांसाठी चारा मिळणे कठीण झाले आहे. परिणामी पशुपालकांना महागड्या दराने चारा विकत घ्यावा लागत आहे. चारा टंचाईमुळे दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन घटले असून गाभण जनावरांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
बोधेगाव येथील शेतकरी तथा गोपालक सदाशिव गायकवाड म्हणाले, विकतचा चारा घेण्यासाठी पैसे नाहीत. जनावरांना उपाशी ठेवण्याची वेळ आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.तालुका पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनाची नोंदणी आणि उपलब्ध चार्याची पाहणी सुरू आहे. मात्र, शेतकर्यांनी तातडीने चारा छावण्या व शासकीय चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली आहे.
साखर कारखान्यांनी काही प्रमाणात हाताने ऊसतोड करून वाढे उपलब्ध करावेत किंवा हार्वेस्टरमधून मिळणारा चारा संकलित करून नाममात्र दरात द्यावा, अशी मागणी होत आहे. तसेच पशुखाद्यावर अनुदान, कारखान्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून चारा उपलब्धता आणि चारा छावण्या सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रशासनाने वेळीच निर्णय न घेतल्यास तालुक्यातील पशुधन संकटात येण्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
Related
Articles
निवडणुकीपूर्वी इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत होते नेतन्याहू
09 Nov 2026
शासकीय रुग्णालयांत दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
06 Nov 2026
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
05 Nov 2026
दिया प्रकरणावरुन न्यायालयाने फटकारले
04 Nov 2026
भूसंपादनासाठी महापालिका उचलणार 450 कोटींचे कर्ज
03 Nov 2026
पोलिओ निर्मूलन पथकावरील हल्ल्यात दोन पोलिस ठार
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित