E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
वर्षभर तुमचे उद्योग बंद ठेवून शेतकर्यांना पाणी द्या
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
राजेंद्र राऊत यांचा रोहित पवार यांना टोला
सोलापूर, (प्रतिनिधी) : उजनी धरण परिसरात प्रस्तावित डेटा सेंटर, सौरऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आणि अणुऊर्जा प्रकल्पांवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पांना विरोध करणारे शेतकरी, मच्छीमार आणि वारकरी पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त करत असताना, प्रकल्पांच्या समर्थनार्थ सत्ताधारी नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. आता आमदार राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत उद्योगांना लागणार्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
आमदार राऊत यांनी रोहित पवार यांच्या बारामती परिसरातील उद्योगांच्या पाणीवापरावर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या दाव्यानुसार, बारामती परिसरातील उद्योगांना अडीच हजार कोटी लिटर पाणी लागते. साखर कारखाने, मद्यनिर्मिती आणि पशुखाद्याशी संबंधित उद्योगांचा उल्लेख करत राऊत यांनी, दुष्काळ संपेपर्यंत रोहित पवार यांनी त्यांचे एक वर्ष उद्योग बंद ठेवावेत आणि हे पाणी शेतकर्यांसाठी वळवावे, अशी भूमिका मांडली. रोहित पवार हे स्वतः उद्योजक असताना उजनीवरील प्रस्तावित प्रकल्पांच्या मुद्द्यावरून विनाकारण लोकांना भडकवण्याचे काम करत असल्याची टीकाही राऊत यांनी केली.
आधी पाण्याची खात्री, मगच प्रकल्प
रोहित पवार यांच्यासह प्रस्तावित प्रकल्पांना विरोध करणार्या नेत्यांचा मुख्य आक्षेप उजनीच्या पाण्याच्या वापरावर आणि भविष्यातील उपलब्धतेवर आहे. सोलापूर, पुणे, अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यांतील शेतकरी, मच्छीमार व वारकरी यांच्यासाठी उजनीचे पाणी जीवनवाहिनी आहे. शेती, पिण्याचे पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांवर या धरणाचा मोठा आधार आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांना पाण्याचे नियोजन करावे लागत असताना मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना किती पाणी दिले जाणार, त्यासाठी स्वतंत्र स्रोत उपलब्ध आहेत का, वापरलेले पाणी पुन्हा प्रक्रिया करून वापरण्याची व्यवस्था आहे का आणि स्थानिक नागरिकांच्या पाणीहक्कांवर त्याचा परिणाम होणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रकल्पांच्या समर्थनापूर्वी या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळावीत, अशी विरोधकांची मागणी आहे.आमदार राऊत यांनी रोहित पवार यांच्या उद्योगांच्या पाणीवापराचा मुद्दा उपस्थित केला, तर प्रकल्पविरोधकांनी उजनीतील पाण्याच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
Related
Articles
पुण्यातील सहा ‘आपला दवाखाने’ रद्द
08 Nov 2026
सीएटलच्या दिवाळी उत्सवात रुढीवादी गटाचा गोंधळ
09 Nov 2026
राज्य टेनिक्वाइट स्पर्धेत पुण्याचे वर्चस्व
05 Nov 2026
लक्ष्मीपूजन धडाक्यात सणाचा उत्साह शिगेला
09 Nov 2026
फटाक्यांवर मुंबईत बंदी
10 Nov 2026
लक्ष्मीपूजनाच्या रात्री भरधाव मोटारीने दुचाकीला उडविले
10 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)