E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
दुष्काळावर राजकारण नको, ठोस उपाय हवेत : शरद पवार
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
टेंभुर्णी, (वार्ताहर) : पाण्याअभावी उद्ध्वस्त होणारी शेती, पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि जनावरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न... अशा भीषण संकटात सापडलेल्या तुळशी गावाची व्यथा अखेर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर मांडण्यात आली. ‘गाव विकणे आहे’ असा फलक लावून राज्याचे लक्ष वेधणार्या तुळशी गावाला रविवारी पवार यांनी भेट देत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधत गावाच्या समस्यांची माहिती घेतली. यावेळी गावाला ५० लाख रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला.
दुष्काळावर केवळ पाहणी, आश्वासने आणि राजकीय चर्चा करून चालणार नाही. पाणीपुरवठ्याचे नियोजन, जनावरांसाठी चारा, रोजगारनिर्मिती आणि नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत यासाठी तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. दुष्काळावर राजकारण नको, ठोस उपाय हवेत अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.
पंतप्रधान मोदी १६ तारखेला बारामतीमध्ये येणार आहेत. त्यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे हे आमच्या पक्षाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडतील. मी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा करत आहे. हा दौरा झाल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, आणि शक्य झालं तर पंतप्रधानांना भेटून ही माहिती त्यांच्यापुढे सादर करणार आहे. असे आश्वासन शरद पवार यांनी शेतकर्यांना दिले.
या दौर्यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार अभिजित पाटील आणि आमदार राजू खरे उपस्थित होते. मात्र, माढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी सुरू असताना माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
Related
Articles
युरोप दौर्यात बॅडमिंटनपटूंना करावा लागला आर्थिक अडचणींचा सामना
04 Nov 2026
आणीबाणी लादणे ही एक चूक होती;इंदिरा गांधींनाही असेच वाटले असावे...
08 Nov 2026
मुख्यमंत्री सहायता निधीस विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दोन कोटींची मदत
05 Nov 2026
पॉवरलिफ्टिंगमध्ये भावना टोकेकर यांची ऐतिहासिक कामगिरी
09 Nov 2026
दुष्काळग्रस्त शेतकर्यांना दहा लाखांची मदत
08 Nov 2026
दिवाळीचे अप्रूप आणि आकर्षण राहिले आहे का?
05 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित