E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
मंगळवेढा तालुक्यात पाणीटंचाई ४२ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
सोलापूर, (प्रतिनिधी) : मंगळवेढा तालुक्यात यंदा पर्जन्यमान न झाल्यामुळे ऐन हिवाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र भीषणता जाणवत असून सद्यस्थितीला ४२ गावामधून ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान अजूनही सहा गावामधून वाढीव टँकरची मागणी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.
जून ते सप्टेंबर अखेर यंदा चक्क पावसाने पाठ फिरवल्यामुळे तालुक्याच्या दक्षिण भागात ओढे, नाले वाहिलेच नाहीत. परिणामी भुगर्भात पाणी पातळीत वाढ न झाल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीही चक्क कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे यंदा सप्टेंबर महिन्यापासूनच या भागात टँकर सुरु करण्याची वेळ प्रशासनास आली आहे. मंगळवेढ्याच्या इतिहासात प्रथमच पाण्याची भीषणता जाणवत असल्याचे वृद्ध जाणकारांमधून सांगण्यात येत आहे. १९७२ ला पडलेल्या दुष्काळामुळे केवळ अन्नाची टंचाई जाणवत होती. मात्र पाणीपुरवठा उपलब्ध असल्याने पाण्याचा तुटवडा झाला नाही.
टँकर सुरु असलेली गावे व कंसात लोकसंख्या
लेंडवे चिंचाळे, भाळवणी (२११३), रड्डे (१६८७), खुपसंगी (२४७१), शिरसी (१६२१), येड्राव (१५७८), नंदेश्वर (३४२५) आंधळगाव (२६५०), लक्ष्वमी दहिवडी (३०४३), पाठखळ (२२४६), येळगी (७१५), भोसे (५१८०),निंबोणी (२९४५), हाजापूर (१२९२), रेवेवाडी (१६२७), बावची (७९५),जुनोनी, महमदाबाद (१८२१), जालिहाळ-सिध्दनकेरी (२३३०), गणेशवाडी (१९१५), खडकी (१५७३), जित्ती (९४३), हिवरगाव (१२५५), गणेशवाडी (१८६०), शिरनांदगी (२१९८), हुलजंती (३५५५), पौट (९७०), सलगर खु. (१०५०), खवे (१०४४), हुन्नूर (३०१०), लोणार (२७००), मारोळी (१५००), जंगलगी (११११), कागष्ट (१३५०), आसबेवाडी (९३५), शिवणगी (१३५४), बालाजीनगर -लमाणतांडा) (२१२४), सोड्डी (१४००), तळसंगी (९५०), चिक्कलगी (१८८५), सलगर बु॥ (३५००), मरवडे (२३१०) आदी गावातून ४२ टँकर सद्यस्थितीला सुरु असून जुनोनी, आंधळगाव, नंदेश्वर, पाठखळ, गणेशवाडी या गावाला पाणी पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे येथून वाढीव टँकरची मागणी प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.
मंगळवेढा तालुक्यात एकूण ८२ गावे असून त्यापैकी ४२ गावामधून टँकर सुरु असल्याने तालुक्याच्या ५० टक्के गावात हिवाळ्यात पाणीटंचाई तीव्र झाल्याचे विदारक चित्र पहावयास सद्यस्थितीला मिळत आहे. या उपर उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती असेल याबाबत जनतेमधून तर्क वितर्क काढले जात आहेत.
Related
Articles
स्वातंत्र्यलढ्यातील तरुणांचे स्फूर्तीस्थान - दामोदर भिडे
06 Nov 2026
कर्जत तालुक्यात कापसाच्या शेतात गांजाची लागवड
06 Nov 2026
सत्तेत बसून मोर्चे काढणार्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा हास्यास्पद
06 Nov 2026
धाराशिवमध्ये ऐन दिवाळीत एका अग्नितांडव !
09 Nov 2026
ओंभासे यांच्यावरील ’एसीबी’च्या कारवाईनंतर अधिकार्यांच्या विभागांमध्ये बदल
06 Nov 2026
उत्कर्ष
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित