E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
क्रीडा
बॉयलच्या शतकामुळे न्यूझीलंड ‘अ’चा डाव सावरला
Samruddhi Dhayagude
02 Nov 2026
ख्राइस्टचर्च : मॅथ्यू बॉयलच्या नाबाद शतकासह डीन फॉक्सक्रॉफ्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड ‘अ’ संघाने रविवारी येथे भारत ‘अ’विरुद्ध दुसर्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी खराब सुरुवातीनंतर दमदार पुनरागमन केले. दिवसअखेर न्यूझीलंडने तीन बाद २१८ धावा केल्या.
बॉयल १४८ चेंडूंमध्ये १०७ धावा करून खेळपट्टीवर कायम होता. त्याच्या खेळीत १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. दुसर्या बाजूला फॉक्सक्रॉफ्टने १८० चेंडूंत ८० धावा केल्या असून त्याने नऊ चौकार लगावले आहेत. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद २०५ धावांची भागीदारी करत न्यूझीलंडला अडचणीतून बाहेर काढले. यापूर्वी भारतीय संघाने कर्णधार ध्रुव जुरेलच्या (१०५) शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३४६ धावा केल्या होत्या. त्यामुळे दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताकडे १२८ धावांची आघाडी होती. न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. एकवेळ संघाची अवस्था तीन बाद १३ अशी झाली होती. सिराज आणि मुकेश कुमार यांनी सुरुवातीलाच न्यूझीलंडला धक्के दिले.
सिराजने कर्णधार राइस मारियू (४) याला बाद केले. यष्टिरक्षक ध्रुव जुरेलने त्याचा झेल टिपला. त्यानंतर मुकेश कुमारने कर्टिस हीफी (४) आणि टिम रॉबिन्सन (३) यांना माघारी धाडत न्यूझीलंडची अवस्था आणखी बिकट केली. मात्र, त्यानंतर बॉयल आणि फॉक्सक्रॉफ्ट यांनी भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. भारतीय गोलंदाजांमध्ये मुकेश कुमार सर्वाधिक प्रभावी ठरला. त्याने १६ षटकांत ४४ धावा देत दोन गडी बाद केले. तर सिराजने १६ षटकांत ४९ धावा देत एक विकेट मिळवली. वॉशिंग्टन सुंदर आणि आकाश दीप यांना मात्र विकेट घेण्यात अपयश आले.
Related
Articles
पॉवरलिफ्टिंगमध्ये भावना टोकेकर यांची ऐतिहासिक कामगिरी
09 Nov 2026
इस्रायलला शस्त्रखरेदीसाठी निधी देणार नाही
06 Nov 2026
भारताची मदार वेगवान गोलंदाजांवर
07 Nov 2026
पंतप्रधानांकडून फडणवीस यांचे कौतुक
09 Nov 2026
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
08 Nov 2026
देशाची प्रगती पाहण्यासाठी सोनियांनी ’इटालियन चष्मा’ काढून टाकावा
08 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
2
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
3
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
4
अमेरिकन संसदेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व
5
लेखी नोटीस नाही म्हणून अटक अवैध ठरत नाही
6
ट्रम्प विरोधी लाट (अग्रलेख)